Home धक्कादायक “प्रेमाच्या नावाखाली शारीरिक वासनेचा खेळ? ब्रेकअपनंतर व्हिडिओ व्हायरल!

“प्रेमाच्या नावाखाली शारीरिक वासनेचा खेळ? ब्रेकअपनंतर व्हिडिओ व्हायरल!

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

लहान मुलीवरील अत्याचाराची प्रक्रिया कधी थाबणार पुन्हा एका बलात्काराचा व्हिडिओ व्हायरल

चंद्रपूर  :-  सिंदेवाही पोलीस ठाण्यात दोन अल्पवयीन तरुण आणि मुलगी (१७ वर्षे) यांच्यातील शारीरिक संबंधाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. दोघेही एकाच वर्गात शिकत होते आणि एकमेकांकडे आकर्षित झाले होते. मात्र त्यांच्यातील अंतर वाढत गेल्याने तरुणाने त्यांच्या मोबाईलवरून त्यांच्या शारीरिक संबंधाचा व्हिडिओ बनवला आणि तो स्नॅपचॅटवर अपलोड केला.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तरुणाला अटक करून त्याचे स्नॅपचॅट खाते ब्लॉक केले. मात्र हा व्हिडिओ आधीच व्हायरल झाला होता.

या प्रकरणी पोलिसांनी तरुणाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. प्रेमाच्या नावाखाली होणारा शारीरिक वासनेचा खेळ किती घातक असू शकतो हे या प्रकरणाची आठवण करून देते.