अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी
बल्लारपूर तालुक्यातील कोर्टीमक्ता, गिलबिली येथील शाळांमध्ये बुक वाटप
चंद्रपूर :- दि,२८/०७/२०२४,विद्यार्थ्यांच्या बुध्दितमत्तेला योग्य दिशा द्यायची असेल तर त्याची सुरुवात त्यांच्या लहानपणापासूनच करायला हवी. विद्यार्थ्यांवर पडलेल्या अशा छोट्या-छोट्या आर्थिक जबाबदाऱ्या आणि स्वावलंबन त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी उपयुक्त ठरतात अश्या बल्लारपूर काँगेसच्या तालुका उपाध्यक्षा तथा शाळा समिती अध्यक्षा सामाजिक कायकर्त्या सौ. नाजुका हनुमान आलाम यांनी म्हणाल्या.
महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्यादित, महाराष्ट्र संचालक तथा चंद्रपूरचे माजी सभापती काँग्रेस नेते दिनेशभाऊ चोखारे यांच्या मार्गदर्शनात बल्लारपूर काँगेसचे तालुका अध्यक्ष गोविंदा पाटील उपरे, बल्लारपूर काँगेसच्या तालुका उपाध्यक्षा तथा शाळा समिती अध्यक्षा सामाजिक कायकर्त्या सौ. नाजुका हनुमान आलाम, यांचे उपस्थितीत बल्लारपूर तालुक्यातील गिलबिली व कोर्टीमक्ता येथील शाळांमध्ये बुक वाटप करण्यात आले.
पुढे बोलतांना त्या म्हणाल्या कि, दिनेश चोखारे याचे हे कार्य अभिमानास्पद आहे.
मुलांच्या बुध्दितमत्तेला योग्य दिशा द्यायची असेल तर त्याची सुरुवात त्यांच्या लहानपणापासूनच करायला हवी. आपण त्यांच्यावर योग्य वयात संस्कार दिले तर त्यांना गोष्टींची जाणीव होईल. मुलांना योग्य वयात बचत आणि बचतीशी संबंधित गोष्टी शिकवा. बचत आणि खर्च यातला फरक त्यांना समजावून सांगा. देशातील वेगवेगळ्या बँकांनी लहान मुलांसाठी बँकेचे खाते उघडण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. ही एक नवी वाटचाल आपल्या मुलांना अगदी लहान वयापासूनच जागरूक करेल.
बचत कशी करायची त्याचे फायदे काय हेही त्यांना सांगा असे सामाजिक कायकर्त्या नाजुका हनुमान आलाम यांनी सांगितले.
यावेळी शिक्षिका पुष्पा आळे, यांनी विद्यार्ध्यांना मागर्दशन करतांना म्हणाल्या कि, छोटे मोठे कोणतेही काम असो ते करतांना आपले ध्येय ठरविणे गरजेचे आहे. जोपर्यंत आपण आपले ध्येय आणि उद्दीष्ट ठरवत नाही तोपर्यंत आपण काय करतो हेच समजत नाही. आज देशाने जगात सर्वच क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. आपला ठसा उमटवला आहे. तसेच आपण सर्वानी काहीतरी करून आपले ध्येय गाठावे व आपली ध्येयपूर्ती करावी.
यावेळी गिलबिली येथील यशोधरादेवी अनुदानित आदिवासी आश्रम शाळा येथे माध्यमिकचे मुख्याध्यापक दिवाकर निरंजने, प्राथमिकचे मुख्याध्यापक बंडूजी पिपरे, अधीक्षक माणिकचंद्र ताडाम, अधीक्षिका कु. पल्लवी मांडवकर, शिक्षिका करुणा बेलेकर, माध्यमिक शिक्षक किशोर पिपळशेंडे, माध्यमिक शिक्षक गुलाब राठोड, प्राथमिक शिक्षक अभिमन्यू शेंडे, शिक्षिका सुषमा गेडाम, मानोरा जिल्हा परिषद उच्च प्राथमिकच्या विषय शिक्षिका पुष्पा आळे, यांचेसह शाळेतील समस्त शिक्षक व चतुर्थ कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
कोर्टीमक्ता येथील स्व. ताराचंद नाईक प्राथमिक आदिवासी आश्रम शाळा येथे मुख्याध्यापक गोपाळ बोबाटे, अधीक्षक मुरकुटे, माजी उपसरपंच दिलीप भोयर, ग्रामपंचायत सदस्य मनोज सोयाम, मनोज भोयर, मदन कुळमेथे, प्राथमिक शिक्षक बोधलकार, प्राथमिक शिक्षक भैसारे, प्राथमिक शिक्षक कन्नाके , प्राथमिक शिक्षक टी. आर. रातोड, प्राथमिक शिक्षक झाडे, प्राथमिक शिक्षक हिरादेवे यांचेसह तसेच शिक्षक, विद्यार्थी आणि शाळेतील कर्मचारी उपस्थित होते.




