अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी
राजुरा :- 23 जुलै रोजी राजुरा येथे झालेल्या गोळीबाराच्या घटनेप्रकरणी चंद्रपूर जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) तीन तासांच्या आत दोन आरोपींना अटक केली. या घटनेत शिवज्योत सिंग या तरुणाचा मृत्यू झाला होता.
देवल.लल्ली शेरगील आणि शगीर उर्फ मोनू कादिर शेख अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून, दोघेही राजुरा येथील रहिवासी आहेत. त्यांना एलसीबीच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडे गुन्ह्यात वापरलेले हत्यार असल्याचे निष्पन्न झाले.
23 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास राजुरा पंचायत समिती चौकाजवळ गोळीबाराची घटना घडली होती, त्यात शिवज्योतसिंग देवल यांचा मृत्यू झाला होता. गुन्हा केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक मुमुका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू, तसेच स्थानिक गुन्हे शाखा, राजुरा पोलीस ठाणे, उपविभाग राजुरा यांच्या अधिकाऱ्यांनी आरोपींच्या शोधासाठी स्वतंत्र पथके तयार केली.
एलसीबीच्या पथकाने घटनेनंतर अवघ्या तीन तासांत आरोपीला पकडण्यात यश मिळविले. याप्रकरणी पुढील तपास राजुरा पोलीस करत आहेत.




