Home Breaking News चंद्रपूर जिल्ह्यात आणखी एका गोळीबाराच्या घटनेने पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह ?

चंद्रपूर जिल्ह्यात आणखी एका गोळीबाराच्या घटनेने पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह ?

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

राजुरा  :-  राजुरा शहरात पंचायत समितीजवळील बँक ऑफ महाराष्ट्रसमोर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना २३ जुलै रोजी सायंकाळी घडली. शिवज्योतसिंग देवल असे मृताचे नाव असून तो राजुरा येथील रहिवासी आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस घटनास्थळी पोहोचले असून या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेने चंद्रपूर जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.