मद्रास उच्च न्यायालयाचा सथानकुलम कस्टोडियल किलिंग प्रकरणात मोठा निकाल
वेब न्यूज :-
तामिळनाडूतील सथानकुलम येथे २०२० मध्ये पिता-पुत्र (जयराज आणि बेनिक्स) यांची पोलीस कोठडीत अमानुष मारहाण करून हत्या केल्याप्रकरणी मदुराई सत्र न्यायालयाने सर्व ९ दोषी पोलीस कर्मचाऱ्यांना मृत्यूदंडाची (फाशीची) शिक्षा सुनावली आहे या ऐतिहासिक निकालात, न्यायालयाने या घटनेला ‘दुर्मिळातील दुर्मिळ’ (Rarest of Rare) कृत्य मानले असून, कोर्टाने पीडितांच्या कुटुंबाला १.४० कोटी रुपयांची भरपाई देण्याचेही आदेश दिले आहेत
ही घटना 2020 मध्ये Tamil Nadu राज्यातील सथानकुलम येथे घडली होती. लॉकडाऊन दरम्यान दुकान उघडे ठेवल्याच्या कारणावरून पोलिसांनी जयाराज आणि त्यांचा मुलगा बेनिक्स यांना ताब्यात घेतले होते. पोलिस ठाण्यात त्यांच्यावर अमानुष मारहाण आणि टॉर्चर करण्यात आल्याचा आरोप होता. या अत्याचारामुळे दोघांचाही मृत्यू झाला.
या घटनेने संपूर्ण देशभर संतापाची लाट उसळली होती. मानवी हक्क संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी पोलिस अत्याचाराविरोधात तीव्र आंदोलन केले होते. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी केंद्रीय यंत्रणांकडे देण्यात आली होती.
दीर्घ सुनावणीनंतर न्यायालयाने दोषी ठरलेल्या 9 पोलिस कर्मचाऱ्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावून कडक संदेश दिला आहे की, कायद्याचे रक्षकच जर कायदा मोडतील तर त्यांना कठोर शिक्षा भोगावी लागेल.
प्रकरणातील मुख्य बाबी:
दोषी पोलीस: इन्स्पेक्टर श्रीधर, उपनिरीक्षक बालाकृष्णन, रघु गणेश यांच्यासह ९ पोलीस
घटनेचे पार्श्वभूमी:
कोविड लॉकडाऊन दरम्यान मोबाईल शॉप उघडे ठेवल्याच्या संशयावरून पिता-पुत्राला अटक करून पोलीस कोठडीत मारहाण करण्यात आली होती
न्यायालयाचे निरीक्षण:
पोलीस कोठडीतील अनैसर्गिक जखमा आणि अत्याचार पोलिसांच्या क्रूरतेचे दर्शन घडवतात, असे कोर्टाने म्हटले आहे
शिक्षा:
दोषींना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली असून, या निर्णयाचे देशभर स्वागत होत आहे



