जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक, औद्योगिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रातील समस्याबाबत त्यांच्यावर विशेष जबाबदारी असल्याने जनतेच्या त्यांच्याकडून खूप अपेक्षा…
चंद्रपूर :-
सनदी अधिकारी वसुमना पंत या महाराष्ट्र केडरच्या २०१७ बॅचच्या आयएएस (IAS) अधिकारी आहेत. त्यांच्याकडे नागपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदाची जबाबदारी होती. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून अर्थशास्त्रात एमए केलेले आहेत, त्यांची नुकतीच चंद्रपूरच्या नव्या जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. वसुमना पंत यांच्या रुपाने चंद्रपूरला पहिल्या महिला जिल्हाधिकारी लाभल्या आहेत. अतिशय धडाडीच्या आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून वसुमना पंत यांची ओळख आहे.
जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक, औद्योगिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रातील विविध समस्याबाबत जिल्हाधिकारी यांचेकडून जनतेला मोठया अपेक्षा असतात, कारण त्यांचेकडूनचं कागदोपत्री शासनाकडे पाठपुरावा होतो व जिल्ह्याचा कारभार यांच्या हाती असतो, खरं तर राजकीय दबावात सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सुटत नसल्याने व प्रशासनातले अधिकारी यांचेवर जिल्हाधिकारी यांचा वचक नसल्याने जनतेला न्याय मिळत नसल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत, जनतेचा आवाज शासनापर्यंत पोहचविण्याची प्रमुख जबाबदारी जिल्हाधिकारी यांची असतें पण ते महत कार्य आत्तापर्यंत इथे चोखपणे झालेलं नाही, त्यामुळे आता नव्यानेच रुजू झालेल्या जिल्हाधिकारी वसुमना पंत यांचेवर फार मोठी जबाबदारी आलेली आहेत, आता त्या जिल्ह्याच्या जिवंत आणि ज्वलंत समस्या कितपत सोडवितात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहेतच, मात्र एक महिला जिल्हाधिकारी चंद्रपूर जिल्ह्याला प्रथमच लाभल्या त्यामुळे त्या निश्चितपणे आपल्या कर्त्यांव्यावर खऱ्या उतरतील याबद्दल शंका करू नये अशी त्यांची अपेक्षा नसावी.




