Home कोरपणा खळबळजनक:-कोरपन्यात कार्यक्रमाच्या नावावर ‘खंडणीखोर’ टोळीचा उच्छाद.

खळबळजनक:-कोरपन्यात कार्यक्रमाच्या नावावर ‘खंडणीखोर’ टोळीचा उच्छाद.

पैसे दिले नाहीं म्हणून तोडफोड करणाऱ्या त्या टोळीची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे होणार तक्रार?

कोरपना (विशेष प्रतिनिधी):-

कार्यक्रमांच्या नावाखाली उघडपणे ‘खंडणी’ वसूल करणारी एक टोळी कोरपना शहरात सक्रिय झाली असून, पैशासाठी कुणाचीही पर्वा न ठेवणाऱ्या या तथाकथित भामट्यानी सर्वसामान्यांचे जगणे कठीण केले आहे. पैसे न दिल्यास तोडफोड आणि दादागिरी करणाऱ्या या गुंडांच्या मुसक्या आवळण्यासाठी आता जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार होणार असल्याची माहिती असून लवकरच त्यांचेवर कारवाई होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

स्वतःचं अवैध धंदे करणारे काही महाभाग आता कार्यक्रमाच्या नावाखाली व्यापारी व अवैध धंदेवाईक यांना लक्ष करून अवैध वसुली करत आहे, विशेष म्हणजे जर व्यापाऱ्यांनी मागितलेले पैसे दिले नाहीं तर त्यांना धमक्या दिल्या जात आहे तर काही ठिकाणी अवैध धंदेवाईक यांना टार्गेट करून तिथे तोंडाफोड केली जात आहे, दरम्यान ​कोरपनाकरांचा संयम आता सुटला आहे. या टोळीच्या प्रत्येक काळ्या कारनाम्याची, अवैध धंद्यांची आणि खंडणीसाठी केलेल्या तोडफोडीची पुराव्यासह एक ‘स्पेशल फाईल’ तयार करण्यात आली आहे. लवकरच हे प्रकरण थेट पोलीस अधीक्षक (SP) यांच्या दरबारी जाणार असून, या खंडणीखोरांची रवानगी तुरुंगात होईपर्यंत नागरिक शांत बसणार नाहीत अशी सूत्रांकडून माहिती आहे.