Home चंद्रपूर गंभीर :- साई वर्धा पॉवर व जिएमआर पॉवर वीज निर्मिती कंपन्याकडून मोठ्या...

गंभीर :- साई वर्धा पॉवर व जिएमआर पॉवर वीज निर्मिती कंपन्याकडून मोठ्या प्रमाणात प्रदूषण.

मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी स्थानिक चिनोरा ग्रामपंचायत सरपंच यांच्यासह गावकऱ्यांना घेऊन जन आंदोलन करण्याचा दिला इशारा.

चंद्रपूर:-

वरोरा तालुक्यातील साई वर्धा पॉवर आणि जिएमआर या दोन वीज निर्मिती कंपन्या जवळपास 1080 मेगावैट वीज निर्मिती करत असून या परिसरातील चिनोरा, दहेगाव, डोंगरगाव, निमसडा मोहबाळा, या गावांतील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी या कंपन्यानी अधिग्रहित केल्या आहे, काही प्रमाणात स्थानिक प्रकल्पग्रस्त तरुणांना इथे रोजगार मिळाला असला तरी या परिसरातील किमान 80 टक्के तरुण बेरोजगारांना पूर्णतः नोकऱ्या मिळाल्या नाहीं, एकीकडे या कंपन्याचं रासायनिकयुक्त पाणी रात्रीच्या वेळेस नाल्यात सोडत असल्याने जल प्रदूषण होतं आहे तर दुसरीकडे कंपनीतील फ्लाय हॅस ची ओव्हरलोड वाहतूक होतं असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषणामुळे शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे नुकसान होऊन जनतेच्या आरोग्यावर सुद्धा विपरीत परिणाम होतं आहे, दरम्यान स्थानिक तरुण बेरोजगारांना इथे रोजगार देण्यास टाळाटाळ करण्यात येतेय व स्थानिक ट्रान्सपोर्टर यांना फ्लाय हॅस वाहतूक आणि विटा बनविणाऱ्यांना हॅस मिळत नाहीं त्यामुळे या दोन्ही कंपन्या विरोधात मोठा रोष असून येत्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती पर्यंत (दिनांक 19 फेब्रुवारी) स्थानिकांच्या समस्या सोडविल्या नाहीं तर 20 फेब्रुवारी 2026 पासून या दोन्ही कंपन्या विरोधात या परिसरातील सर्व गावातील तरुण बेरोजगार व शेतकऱ्यांना घेऊन मोठे जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी पत्रकार परिषदेतून जिल्हा व कंपनी प्रशासनाला दिला आहे, यावेळी मनसे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, मनसे रोजगार स्वयंरोजगार जिल्हाध्यक्ष मनोज तांबेकर, मनसे जनहीत जिल्हाध्यक्ष रमेश काळबांधे, सुनील गुढे यांच्यासह चिनोरा ग्रामपंचायत सरपंच ताई अरुण परचाके, सदस्य निलेश डोंगरकार, सदस्या छाया बालाजी कोल्हेकर, आशिष रोडे व इतर गावकरी उपस्थित होते,

साई वर्धा पॉवर व जिएमआर या कंपण्याच्या माध्यमातून फ्लायहॅस ची ओव्हरलोड वाहतूक होतं असून त्यातून हॅस रस्त्यावर व इतरत्र उडून मोठया प्रमाणात वायू प्रदूषन होतं आहे व त्यामुळे रस्त्यालागत असणाऱ्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान होतं आहे, पण त्या बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई हया कंपन्या देत नाहीं, या हॅस मुळे मोठ्या प्रमाणात वायू व जल प्रदूषण पसरल्याने याशिवाय या कंपन्यातून वेस्टेज वाटरच्या नावाखाली रासायनिकयुक्त पाणी जवळील नाल्यात सोडल्या जातं असल्याने व त्यातून घातक रासायनिक पाणी पिल्याने जनावरांनाबिमाऱ्या होतं आहे व त्यांना पिण्यासाठी पाणी मिळत नाहीं, या घातक रसायने जमिनीत मुरल्याने जवळील विहिरी मध्ये येणारे पाणी सुद्धा पिण्या योग्य नाहीं आणि त्यातून दमा, अस्थामा, टीबी, कैन्सर व त्वचेचे मोठे आजार होतं आहे, पर्यायाने या परिसरातील जनतेच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे, दरम्यान सदर फ्लाय हॅस वाहतूकी करिता बाहेरील कंपन्यांना ( हॅस टॅग कंपनी ) कंत्राट जिएमआर कंपनीने दिले आहे तर साई वर्धा पॉवर कंपनीने ज्यांना कंत्राट दिले ते त्यांच्या नियोजित ठिकाणी फ्लाय हॅस टाकत नसून विटा बनविणाऱ्यां बाहेरच्यांना ती हॅस विकत आहे. मात्र स्थानिक ट्रान्सपोर्टर यांना हें काम नसल्याने जवळपास च्या विटा बनविणाऱ्या स्थानिक उद्योजकांना फ्लाय हॅस मिळत नाहीं, पर्यायाने त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे.

कंपन्यानी गावे दत्तक घेतली मात्र विकासाच्या नावावर बोंबा.

साई वर्धा पॉवर व जिएमआर या दोन्ही कंपन्यानी या परिसरातील अनेक गावे दत्तक घेतली, मात्र त्या गावांचा सर्वांगीण पायाभूत विकास त्यांनी केल्याचे कुठेही दिसत नसून सीएसआर चा पैसा हा लोकप्रतिनिधी व काही राजकीय नेत्यांच्या ईशाऱ्यांनी इतरत्र वापरला जातो, एक तर स्थानिक बेरोजगार तरुणांची फौज असतांना त्यांच्या हाताला काम नाहीं, प्रदूषणाने आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे, कुठल्याही गावाचा विकास नाहीं तर मग हया कंपन्यांना केवळ राजकीय नेत्यांच्या ईशाऱ्यांनी चालू द्यायच्या का? असा सर्वसामान्य गावकऱ्यांना प्रश्न पडत आहे, त्यामुळे कंपनी परिसरातील जनतेच्या समस्याबाबत साई वर्धा पॉवर आणि जिएमआर हया कंपन्यांची बैठक बोलावून या परिसरातील जनतेचे प्रश्न येत्या 19 फेब्रुवारी 2026 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनापर्यंत सोडवावे अन्यथा 20 फेब्रुवारी 2026 पासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून या परिसरातील गावकऱ्यांना घेऊन या कंपन्याच्या विरोधात सामूहिक जनआंदोलन कारण्यात येईल, या दरम्यान कायदा सुव्यवस्था बिघडल्यास स्वतः जिल्हा प्रशासन व कंपनी व्यवस्थापन जबाबदार असेल असा इशारा राजू कुकडे यांनी दिला आहे.