Home चंद्रपूर बाबुपेठ प्रभाग क्रमांक 17 च्या अ गटात जोरदार लढत, मनसेचे पियुष धुपे...

बाबुपेठ प्रभाग क्रमांक 17 च्या अ गटात जोरदार लढत, मनसेचे पियुष धुपे व अपक्ष अजय गज्जल यांच्या टक्कर.

प्रस्थापित भाजप कांग्रेस व बहुजन समाज पक्षाच्या उमेदवारावर मतदारांनी फिरवली पाठ, कोण जिंकणार याकडे लक्ष.

चंद्रपूर :-

चंद्रपूर मध्ये प्रभाग क्रमांक 17 च्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर परिसरात बहुजन समाज पक्षाचा जोर असतांना आता तिथे मनसे व अपक्ष उमेदवारानी प्रचारात आघाडी घेतली आहे, मनसेचे जनहीत विभागाचे शहर अध्यक्ष पियुष धुपे व त्यांचे सोबत असलेले ब व क गटातील उमेदवार यांनी प्रचारात आपली जोरदार उपस्थिती दाखवली तर अपक्ष असणारे अजय गज्जल यांनी आपल्या अभिनव प्रचारामुळे लालपेठ परिसरात जोरदार मुसंडी मारली आहे, त्यामुळे आता आज कुणाला बढतi मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

प्रस्थापित पक्षाचे उमेदवार पैसे वाटप करून मतदारांना आकर्षित करत असतांना व मंदिर विहार बांधकाम यासाठी पैसे देत असतांना मनसेचे उमेदवार पियुष धुपे हे आजवर आपण केलेल्या सामाजिक कामाचा आढावा मतदारापुढे मांडत असल्याने त्यांना मतदारांची साथ मिळत आहे तर अपक्ष अजय गज्जल यांना लालपेठ परिसरात मोठा पाठिंबा मिळत असल्याने या दोघांमध्ये क गटात जोरदार टक्कर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज मतदार काय भूमिका घेणार याकडे राजकीय पक्षाचे लक्ष लागलेले आहे.