Home चंद्रपूर धुरळा :- चंद्रपूर मनपाच्या भानापेठ प्रभाग क्रमांक 11 मध्ये शिवसेना मनसे युतीची...

धुरळा :- चंद्रपूर मनपाच्या भानापेठ प्रभाग क्रमांक 11 मध्ये शिवसेना मनसे युतीची चर्चा

मनसे कडून रमेश काळबांधे ड गटात तर शिवसेना उबाटा कडून क गटात पल्लवी कार्लेकर प्रमुख लढतीत.

चंद्रपूर :

मुंबई महाराष्ट्रात सर्वत्र मनसे उबाटा सेनेची युती झाली असतांना चंद्रपूर महानगरपालिकेत मात्र शिवसेनेने वंचित बहुजन आघाडी सोबत युती करून सर्वानाचं आश्चर्याचा धक्का दिला होता मात्र भानापेठ प्रभाग क्रमांक 11 मध्ये मनसे उबाटा सेनेमध्ये युती झाली असून मनसे कडून रमेश काळबांधे ड गटात तर शिवसेना उबाटा कडून क गटात पल्लवी कार्लेकर प्रमुख लढतीत आहे, दरम्यान या प्रभागात ड गटात भाजप तर्फे संजय कंचर्लावार व कांग्रेस च्या आईचंवार या श्रीमंत उमेदवारापुढे मनसेचे उमेदवार रमेश काळबांधे हे आर्थिक दृष्ट्या कमजोर असले तरी यावेळी गरीब पण होतकरू उमेदवारालाचं निवडून देण्याचं या प्रभागातील मतदारांनी ठरवलं असल्याने मनसे उमेदवार रमेश काळबांधे यांना मोठी सहानुभूती मिळत असल्याचे राजकीय चित्र दिसत आहे तर दुसरीकडे उबाटाच्या उमेदवार पल्लवी कार्लेकर यांनी आपल्या कार्यकर्त्यासह प्रचारात मनसे उमेदवार रमेश काळबांधे यांच्या सोबत जोर लावला असल्याने त्यांची सुद्धा सगळीकडे हवा तयार झाली आहे, जर योग्य समन्वय आणि कट्टर महाराष्ट्र सैनिक आणि शिवसैनिक यांनी उद्या किल्ला लढवला तर या दोन्ही उमेदवाराला मोठी सहानुभूती मिळून जिंकण्याची संधी आहे.

भानापेठ प्रभागाची निवडणूक वादग्रस्त होतं असून भाजप चे संजय कंचर्लावार यांना या प्रभागात मतदारांनी आठ वर्ष कुठे गेला होता हे प्रश्न करून हुसकावून लावले होते तर कांग्रेसचे उमेदवार पंकज आईचंवार यांचा वार्डातील जनतेशी थेट संबंध नसल्याने जनसंपर्क कार्यालयातून गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडविणारे रमेश काळबांधे यांना मतदारांची पसंती वाढत आहे, शिवाय अपक्ष उमेदवार यांचे रमेश काळबांधे यांना ड गटाकरिता समर्थन मिळत असल्याची जोरदार चर्चा आहे, उबाटा सेनेच्या पल्लवी कार्लेकर यांनी गुप्त प्रचारात मोठा जनसंपर्क वाढवीला होता त्याचा त्यांना फायदा होण्याची दाट शक्यता असल्याने या प्रभागात मनसे शिवसेना उबाटा युतीची जोरदार चर्चा होतांना दिसत आहे.