Home चंद्रपूर बाबुपेठ प्रभाग क्रमांक 13 मध्ये वंचित उमेदवार मुकेश गाडगे यांचा जय भीम...

बाबुपेठ प्रभाग क्रमांक 13 मध्ये वंचित उमेदवार मुकेश गाडगे यांचा जय भीम ला नकार?

प्रचारा दरम्यान जोरदार चर्चा,जय श्रीराम वाले जय भीम कसे बोलणार? यावरून बौद्ध मतदारांमध्ये विरोध?

चंद्रपूर :-

उमेदवारी मिळावी यासाठी राष्ट्रीय पक्षांकडे पायघड्या झिजविणारे इच्छुक उमेदवार जेंव्हा हतबल होतात तेंव्हा नको त्या पक्षाची उमेदवारी घेऊन निवडणूक लढावी लागते, मात्र प्रत्येक पक्षाची एक वेगळी विचारधारा असल्याने मुळात ज्या पक्षाचे विचार मनामध्ये रुजले ते विचार मात्र सुटता सुटत नाही आणि मग निवडणूकीच्या प्रचारात वैचारिक मतभिन्नता दिसत असल्याने मूळ पक्षाचे कार्यकर्ते नवीन विचारधारेच्या उमेदवाराला सहन करू शकतं नाही, असाच एक वाक्या बाबुपेठ प्रभाग क्रमांक 13 मध्ये घडला असून वंचित चे उमेदवार मुकेश गाडगे हे भाजप विचारधारेचे असल्याने ते प्रचारा दरम्यान जय भीम म्हणतं नसल्याने बौद्ध बांधव नाराज झाल्याची जोरदार चर्चा आहे.

प्रभाग क्रमांक 13 मध्ये मोठ्या प्रमाणात बौद्ध बांधवांची संख्या आहेत, इथे बौद्ध उमेदवाराचं नेहमी वर्चस्व राहिलं आहे पण आरक्षण जर ओबीसी असेल तर मात्र इथे गोची होते त्यामुळे दुसऱ्या जातीचा उमेदवार उभा ठेवावा लागतो, खरं तर या प्रभागात वंचित आणि बहुजन समाज पक्षाचे उमेदवार नेहमी निवडून येत असतात मात्र यावेळी हिंदुत्ववादी विचारधारेला पकडून आपला जय श्रीराम चा नारा बुलंद करणारे मुकेश गाडगे यांना वंचित ची उमेदवारी मिळाल्याने जय भीम म्हणायची वेळ त्यांच्यावर आली परंतु ते यासाठी तयार नसून जय भीम चा नारा ते लावत नसल्याने बौद्ध मतदार त्यांच्यावर नाराज असल्याची चर्चा आहे. मात्र यामुळे वंचित चे दुसरे उमेदवार स्नेहल रामटेके यांना यामुळे मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.