Home Breaking News वडगाव प्रभाग क्र. ८ : OBC उमेदवारीवर संभ्रम निवडणूक निरीक्षक चैनसुख संचेती...

वडगाव प्रभाग क्र. ८ : OBC उमेदवारीवर संभ्रम निवडणूक निरीक्षक चैनसुख संचेती यांनी प्रथम AB फॉर्म सोहम बुटले यांना दिला; तरीही भाजपात प्रश्नचिन्ह कायम!

वडगाव प्रभाग क्र. ८ : OBC उमेदवारीवर संभ्रम निवडणूक निरीक्षक चैनसुख संचेती यांनी प्रथम AB फॉर्म सोहम बुटले यांना दिला; तरीही भाजपात प्रश्नचिन्ह कायम!

कोण खरा OBC उमेदवार उदयाला होणार जाहीर

चंद्रपूर :-  चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये उमेदवारी वाटपाचा पेच वाढताना दिसत आहे. वडगाव प्रभाग क्रमांक ८ मध्ये OBC प्रवर्गातील उमेदवारीवरून भाजपात स्पष्ट मतभेद निर्माण झाले असून, यामुळे स्थानिक पातळीवर संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे.

News reporter :- अतुल दिघाडे

भाजपा आमदार किशोर जोरगेवार हे चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक प्रमुख तर भाजपाच्या निवडणूक मार्गदर्शन आमदार सुधीर मुनगंटीवार, निवडणूक निरीक्षक म्हणून चैनसुख संचेती, तर निवडणूक प्रभारी म्हणून माजी खासदार अशोक नेते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या अनुभवाचा लाभ या निवडणुकीत मिळणार असल्याचेही यापूर्वी स्पष्ट झाले होते.

असे असतानाही वडगाव प्रभाग क्रमांक ८ मध्ये आज सकाळी भाजपाचे निवडणूक निरीक्षक चैनसुख संचेती यांनी प्रथम AB अर्ज सोहम बुटले यांना दिल्याची माहिती समोर आली. मात्र, त्यानंतर त्याच प्रभागासाठी पुन्हा दोन अधिकृत AB फॉर्मचे वाटप करण्यात आल्याने मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एका जागेसाठी एकापेक्षा अधिक अधिकृत फॉर्म दिल्यामुळे “भाजपाचा खरा OBC उमेदवार नेमका कोण?” असा सवाल कार्यकर्ते व मतदारांमध्ये उपस्थित होत आहे.

या प्रकारामुळे भाजपाच्या स्थानिक संघटनात्मक शिस्तीवर प्रश्न उपस्थित झाले असून, इच्छुक उमेदवारांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. तसेच, निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबतही चर्चा सुरू झाली आहे. वडगाव प्रभागातील कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, वेळेत स्पष्ट निर्णय न झाल्यास बंडखोरी किंवा नाराजी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

एकीकडे भाजप गटबाजी संपवून संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न करत असताना, दुसरीकडे अशा प्रकारच्या घटनांमुळे पक्षाची अडचण वाढत असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. आता या प्रकरणावर वरिष्ठ पातळीवरून काय निर्णय घेतला जातो, आणि वडगाव प्रभाग क्रमांक ८ साठी OBC उमेदवारीचा अंतिम शिक्का कोणाच्या नावावर बसतो, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.