Home चंद्रपूर धक्कादायक :- मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रचार सभानंतर सुद्धा चंद्रपूर जिल्ह्यात भाजचे पानिपत..

धक्कादायक :- मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रचार सभानंतर सुद्धा चंद्रपूर जिल्ह्यात भाजचे पानिपत..

जेष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिपद पदापासून दूर केल्याने भाजपला बसला जोरदार फटका. 11 पैकी केवळ एक जागा.

चंद्रपूर:-

राज्यात नुकत्याच लागलेल्या नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीत भाजप आणि मित्रपक्षाला भरघोस यश मिळाल्याचे चित्र असताना चंद्रपूर मध्ये मात्र 11 पैकी केवळ एका ठिकाणी भाजप चा नगराध्यक्ष निवडून आला तर 11 पैकी 8 ठिकाणी कांग्रेसचे नगराध्यक्ष निवडून आले व शिवसेना आणि अपक्ष असे प्रत्येकी एक नगराध्यक्ष निवडून आले आहे. दरम्यान भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचार सभा घेतल्या मात्र त्याचा मतदारावर परिणाम झाला नाही, कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पेक्षा जेष्ठ उच्च शिक्षित अनुभवी असणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिपदापासून दूर ठेवलं जे स्वतः मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार आहे व ज्यांनी मागील विधानसभा अधिवेशनात आपली वाघाची डरकाळी फोडून स्वतःच्या सत्ताधारी यांना धारेवर धरले त्यांना पक्षाच्या मुख्य प्रवाहापासून दूर करणे भाजप ला भोवले, कारण सुधीर मुनगंटीवार यांना मंत्री पद तर दिलं नाहीचं उलट त्यांच्या विरोधात स्थानिक आमदारांना बळ दिल्यामुळे मुनगंटीवार समर्थक नाराज होते, त्याचा फटका भाजप ला बसला असल्याचे बोलल्या जात आहे.

चंद्रपुरात काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या होमपिचवर काँग्रेसने मोठं यश संपादन केलं आहे. चंद्रपुरात 11 पैकी 8 जागेवर काँग्रेसनं विजय मिळवला आहे. तर भाजपला आणि शिंदेंच्या शिवसेनेला अवघ्या 1-1 जागी समाधान मानावं लागलंय. तर एका जागेवर अपक्षाने विजय मिळवला आहे. दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसला मिळालेल्या घवघवीत यशावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी बोलकी प्रतिक्रिया देत ‘चंद्रपूर मे टायगर अभी जिंदा हैं’ असं म्हटलंय.

कांग्रेस मध्ये एकी तर भाजप मध्ये दरार?

कांग्रेस मध्ये सर्वांची एकत्र मेहनत करून व कार्यकर्त्यांचा समन्वय साधून जनतेचा जो विश्वास मिळवीला त्यामुळे त्यांना घवघवीत यश मिळवलं हे यश पुरोगामी विचाराच आहे, म्हणूनच भाजपला 11 पैकी 1 जागा मिळाली आहे. भाजपाला बाकी ठिकाणी यश मिळाले असलं तरी काँग्रेसने चंद्रपूरचा गड राखला आहे. अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

कोण कुठे निवडून आले नगराध्यक्ष?

भद्रावती नगराध्यक्ष : शिंदे सेनेचे प्रफुल्ल चटकी विजयी
वरोरा नगराध्यक्ष : काँग्रेसच्या अर्चना ठाकरे विजयी
मूल नगराध्यक्ष : काँग्रेसच्या एकता समर्थ विजयी
राजुरा नगराध्यक्ष – काँग्रेसचे अरुण धोटे विजयी
गडचांदूर नगराध्यक्ष – अपक्ष (भाजप बंडखोर) निलेश ताजने विजयी
नागभीड नगराध्यक्ष : काँग्रेसच्या स्मिता खापर्डे विजयी
ब्रम्हपुरी नगराध्यक्ष : काँग्रेसचे योगेश मिसार विजयी
चिमूर नगराध्यक्ष : भाजपच्या गीता लिंगायत विजय
घुग्गुस नगराध्यक्ष : काँग्रेसच्या दिप्ती सोनटक्के विजयी
बल्लारपूर नगराध्यक्ष : काँग्रेसच्या अलका वाढई आघाडीवर
भिसी (नगरपंचायत) नगराध्यक्ष : भाजपचे अतुल पारवे विजयी