Home Breaking News MBA चा पेपर बाजूला ठेवून नागरिकांसाठी धावले सोहम बुटले

MBA चा पेपर बाजूला ठेवून नागरिकांसाठी धावले सोहम बुटले

MBA चा पेपर बाजूला ठेवून नागरिकांसाठी धावले सोहम बुटले

वडगांव प्रभाग क्र, 8 मधील नागरिकांच्या मनातला भावी नगरसेवक!

चंद्रपूर :-  चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या घोषणा होताच शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. आजी-माजी नगरसेवकांसह नवोदित व भावी नगरसेवक जनतेच्या दारात पोहोचत असले तरी, वडगांव प्रभाग क्रमांक ८ मधील चित्र मात्र काहीसे वेगळे आणि आशादायी दिसून येत आहे. या प्रभागात माजी नगरसेवकांपेक्षा युवा नेतृत्व अधिक सक्रिय असल्याचे स्पष्टपणे जाणवत असून, नागरिकांच्या मनात एकाच नावाची चर्चा आहे— युवा नेतृत्व असलेले भावी नगरसेवक इं. सोहम किरण सुदर्शन बुटले.

News reporter :- अतुल दिघाडे

वडगांव प्रभागातील नागरिकांसाठी काम करताना शिक्षण, वेळ किंवा वैयक्तिक अडचणी आड येऊ नयेत, याचे जिवंत उदाहरण सोहम बुटले यांनी आज दाखवून दिले. आज सोहम बुटले यांचा MBA चा अत्यंत महत्त्वाचा पेपर असतानाही त्यांनी नागरिकांच्या तातडीच्या समस्येला सर्वोच्च प्राधान्य दिले.

हवेली गार्डन परिसरातील नागरिक अत्यंत गंभीर समस्येला सामोरे जात होते. परिसरातील नाल्या तुटलेल्या व सांडपाण्याने भरलेल्या असल्याने दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव आणि किडे-मकोड्यांचे साम्राज्य वाढले होते. यामुळे लहान मुले, वृद्ध आणि महिलांचे आरोग्य गंभीर धोक्यात आले होते. ही बाब नागरिकांनी सोहम बुटले यांच्या निदर्शनास आणून दिली.

स्वतःचा अभ्यास आणि परीक्षेचा ताण बाजूला ठेवून, सोहम बुटले यांनी तात्काळ मनपा अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधला, स्वतः घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली आणि वेळ न दवडता नालीसफाईसाठी फायर मशीन व कर्मचारी तैनात करून काम सुरू करून दिले. आपल्या सहकारी टीमला स्पष्ट सूचना देत कामावर लक्ष ठेवून, सर्व काही सुरळीत सुरू आहे याची खात्री केल्यानंतरच ते आपल्या MBA चा पेपर देण्यासाठी रवाना झाले.

“पेपर महत्त्वाचा आहे, पण नागरिकांचे आरोग्य त्याहूनही महत्त्वाचे आहे,” हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले.

या कार्यामुळे हवेली गार्डन परिसरातील नागरिक अक्षरशः भावूक झाले. नागरिकांनी सोहम बुटले यांचे मनःपूर्वक आभार मानले व त्यांच्याबद्दल विश्वास व्यक्त केला. नागरिकांच्या मते, “सोहम किरण सुदर्शन बुटले हे फक्त बोलणारे नेते नसून, वेळप्रसंगी स्वतः पुढे येऊन काम करणारे नेतृत्व आहे.”

या नालीसफाईच्या कामावेळी
श्री. विनोद मालेकर, श्री. राजेंद्र सरोदे, श्री. अनिल कोरेकर, श्री. नितिन अंडनकर, माजी तहसीलदार श्री. वांड्रे, श्री. सुधीर गवई आदी नागरिक उपस्थित होते. त्यांच्या साक्षीने हे काम यशस्वीपणे पूर्ण झाले.

आजच्या या घटनेनंतर वडगांव प्रभाग क्रमांक ८ मध्ये एकच चर्चा आहे—
“जो तरुण स्वतःच्या परीक्षेपेक्षा नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देतो, तोच खरा लोकप्रतिनिधी.”

म्हणूनच आता हे स्पष्टपणे दिसून येत आहे की, यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीत वडगांव प्रभाग ८ मधून इं. सोहम बुटले हेच नागरिकांच्या मनातले, विश्वासाचे आणि निश्चित भावी नगरसेवक म्हणून पुढे येत आहेत.