Home Breaking News मनपा निवडणूक जाहीर; जटपुरा गेट-रामनगर रोड परिसरात सक्रिय भावी नगरसेवक रवी लोणारकर नागरिकांच्या...

मनपा निवडणूक जाहीर; जटपुरा गेट-रामनगर रोड परिसरात सक्रिय भावी नगरसेवक रवी लोणारकर नागरिकांच्या थेट संवादातून लोणारकरांची ‘चाय पे चर्चा’ चर्चेचा विषय

मनपा निवडणूक जाहीर; जटपुरा गेट-रामनगर रोड परिसरात सक्रिय भावी नगरसेवक रवी लोणारकर नागरिकांच्या थेट संवादातून लोणारकरांची ‘चाय पे चर्चा’ चर्चेचा विषय

चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकांची अधिकृत तारीख राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आली असून, शहरातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. निवडणूक रणधुमाळी सुरू होताच प्रभागागणिक इच्छुक, आजी-माजी व नवोदित नगरसेवकांनी जनसंपर्क आणि प्रचाराला गती दिली आहे. याच पार्श्वभूमीवर जटपुरा गेट–रामनगर रोड परिसरात राजकीय वातावरण चांगलेच तापलेले दिसून येत आहे.

News reporter :- अतुल दिघाडे

कुठे रस्ते दुरुस्ती, पथदिव्यांचे प्रश्न, घनकचरा व्यवस्थापन, नाल्यांची स्वच्छता, तर कुठे विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन अशा विविध माध्यमांतून उमेदवार नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र थेट नागरिक संवादाला प्राधान्य देणारे उपक्रम अधिक प्रभावी ठरत असल्याचे चित्र आहे.

याच अनुषंगाने जटपुरा गेट, पंचतली हनुमान मंदिर, रामनगर रोड परिसरात भावी नगरसेवक रवी भाऊ लोणारकर यांच्या ‘चाय पे चर्चा’ या अभिनव उपक्रमाची शहरभर चर्चा सुरू आहे. सकाळच्या वेळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांसोबत चहाच्या टपरीवर बसून प्रभागातील समस्या, विकासकामे, मूलभूत सुविधा व नागरिकांच्या अपेक्षा जाणून घेण्याचा हा उपक्रम नागरिकांच्या पसंतीस उतरला आहे.

गेटपुरा गेट प्रभागात सतत सक्रिय राहणारे, कामातून विश्वास निर्माण करणारे आणि “नागरिकांच्या मनातील नेता” अशी ओळख मिळवणारे रवी भाऊ लोणारकर आपल्या साध्या, आपुलकीच्या व थेट संवादशैलीमुळे वेगळे ठरत आहेत. कोणताही औपचारिक मंच न उभारता, चहाच्या कपावर होणाऱ्या या चर्चांमुळे नागरिक आपली मते व अडचणी मोकळेपणाने मांडत असल्याचे चित्र आहे.

आज जटपुरा गेट प्रभागातील ‘श्रीमंत योगी चाय’ येथे पार पडलेली ‘चाय पे चर्चा’ विशेष लक्षवेधी ठरली. यावेळी परिसरातील नागरिक, युवक व ज्येष्ठ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, वाहतूक, आरोग्य सुविधा आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली. नागरिकांच्या समस्या शांतपणे ऐकून घेत त्यावर ठोस उपाययोजना करण्याची सकारात्मक भूमिका रवी भाऊ लोणारकर यांनी मांडली.

या सातत्यपूर्ण जनसंपर्कामुळे, प्रभागातील विकासकामांबाबतची त्यांची भूमिका आणि नागरिकांशी असलेला थेट संवाद यामुळे रवी भाऊ लोणारकर यांना प्रभागात मोठी लोकसमर्थन मिळत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. “चाय पे चर्चा” हेच आता त्यांच्या कार्यशैलीचे प्रतीक बनले असून, निवडणूक जाहीर झाल्यानंतर या चर्चांना अधिकच उत्साह प्राप्त झाला आहे.

एकूणच, महानगरपालिका निवडणूक तारीख जाहीर झाल्यानंतर जटपुरा गेट प्रभागात सक्रिय भावी नगरसेवक म्हणून रवी भाऊ लोणारकर यांची वाढती लोकप्रियता, कामाची पद्धत आणि नागरिकांची स्पष्ट पसंती पाहता, येत्या निवडणुकीत ते एक प्रभावी दावेदार ठरणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.