Home Breaking News “आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना यश — गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेअंतर्गत...

“आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना यश — गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ३२ लाभार्थ्यांना आर्थिक भरपाईचा निधी मंजूर”

“आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना यश — गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ३२ लाभार्थ्यांना आर्थिक भरपाईचा निधी मंजूर”

“बल्लारपूरमधील ५ शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी ₹२ लाखांची भरपाई वितरित”

चंद्रपूर :-  शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सातत्याने कार्यरत असलेले महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री व विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ३२ लाभार्थ्यांना आर्थिक भरपाईचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील ५ लाभार्थ्यांचा समावेश असून, त्यांना प्रत्येकी ₹२ लाखांचे धनादेश आमदार मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
News reporter :- अतुल दिघाडे

ही धनादेश वितरणाची कार्यक्रम चंद्रपूर येथील जनसंपर्क कार्यालयात पार पडला. दिवाळीपूर्वी शेतकरी कुटुंबांना दिलासा मिळावा, या उद्देशाने आ. मुनगंटीवार यांनी प्रशासनाशी समन्वय साधत सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळे ही भरपाई वेळेत मंजूर होऊन वितरितही झाली आहे.

शेतकऱ्यांच्या वेदनांशी भावनिक नातं जोडणारे आणि त्यांच्या अडचणींवर संवेदनशीलतेने प्रतिसाद देणारे नेतृत्व म्हणजे आ. सुधीर मुनगंटीवार यांचे हे कार्य आहे, असे या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी सांगितले.

ही योजना:
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली एक महत्वाची योजना आहे, ज्याअंतर्गत अपघातात मृत्युमुखी पडलेल्या अथवा अपंगत्व आलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत दिली जाते.

शेतकऱ्यांसाठी दिलासा:
या योजनेतून मिळणारी भरपाई ही शेतकरी कुटुंबासाठी मोठा आधार ठरते. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ही मदत मिळाल्याने लाभार्थी कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.