धानोरकर परिवारामध्ये रंगलेला राजकीय कलगीतुरा चव्हाट्यावर, राजकीय अस्तिव कायम ठेवण्यासाठी अनिल धानोरकर यांचा शेवटचा प्रयत्न…
भद्रावती (जावेद शेख):-
भद्रावती शहरात आणि तालुक्यात राजकीय भूकंप होणार असल्याच्या वार्ता होत असतांना आता पुर्वाश्रमीचे शिवसैनिक आणि तीन वेळा नगराध्यक्ष राहणारे अनिल धानोरकर हे स्वतःच्या घरात राजकारणं शिरल्याने व आपण राजकीय प्रवाहाबाहेर फेकल्या जातोय या विवेंचनेने भाजप मध्ये आज मुंबई येथे प्रवेश घेणार असल्याची खळबळजनक बातमी समोर आली आहे, स्वर्गीय बाळू धानोरकर यांच्या प्रभावी नेतृत्वाने धानोरकर परिवाराला राजकीय क्षितिजावर पोहचवल्यानंतर काळाने घात केला आणि एकसंघ असणारा धानोरकर परिवार दुभंगला तो विधानसभा निवडणुकीत दिसला, निवडणूकीच्या रिंगणात धानोरकर परिवार आमनेसामने असल्याचे चित्र बघावंयास मिळाले त्यामुळे आता धानोरकर परिवारामध्ये रंगलेला राजकीय कलगीतुरा चव्हाट्यावर आल्यामुळे, राजकीय अस्तिव कायम ठेवण्यासाठी अनिल धानोरकर यांनी शेवटचा प्रयत्न म्हणून अगदी टोकाची भूमिका घेऊन भाजप मध्ये जाण्याची रणणिती आखली आखली असल्याचे चित्र आहे.
“राजकारणं हा बदमाशाचा शेवटचा अड्डा आहे आहे” असं म्हटल्या जातं, त्यात काही अंशी खरं पण आहे, कारण कितीही बदमाशा आणि भ्रष्टाचार केला तरी राजकीय वलय असलं आणि राजकीय गॉडफादर सत्ताधारी असला तर भ्रष्टाचारी हे भ्रष्टाचारी राहत नाही तर ते मग समाजसेवक म्हणून मिरविले जातात, त्यातच देशाचा आणि जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असलेला भाजप हा पक्ष तर “राजकीय कोंडवाडा.” झाला आहे, तिथे अनेक पक्षाचे नाराज नेते, लोकप्रतिनिधी आणि ज्यांना पर्याय नाही असे प्रवाहाबाहेर फेकलेले नेते भाजपच्या कोंडवाड्यात प्रवेश करून आपलं राजकीय अस्तित्व बघू पाहतात, पण इतिहास साक्षी आहे की तिथे जें गेले ते संपले आहे, त्यात मनसे मधून भाजप मध्ये जाणारे डॉ. अनिल बुजोने असेल किंव्हा विधानसभेची उमेदवारी जणू मिळालीच आहे म्हणून मनसे मधून जाणारे तथाकथित डॉ. रमेश राजुरकर असेल, हे जें गेले ते नंतर दिसलेच नाही अशी विदारक परिस्थिती असतांना ज्यांच्या घरी आमदार खासदार आणि स्वतः दोन टर्म मध्ये नगराध्यक्ष म्हणून कारकीर्द गाजवाली ते अनिल धानोरकर भाजप मध्ये आज पक्ष प्रवेश करणार असल्याची चर्चा भद्रावती शहरात सुरू आहे.




