प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री अशोक उईके यांची आमरण उपोषणकर्त्याशी भेट.
आज बैंकेद्वारे नियुक्ती पत्र वाटप झाल्यानंतर सुद्धा येणार स्थगिती. मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट?
चंद्रपूर :-
सिडीसीसी बैंकेच्या भ्रष्ट व बोगस नोकर भरती विरोधात आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीचं जे आमरण उपोषण सुरु आहे त्याचा आज अकरावा दिवस असून आमरण उपोषणकर्ते मनोज पोतराजे यांची प्रकृती खालावली आहे, त्यामुळे सामाजिक संघटनाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून सिडीसीसी बैंकेच्या बोगस नोकर भरतीचा निषेध करण्यासाठी समितीचे सदस्यांनी सिडीसीसी बैंकेच्या घटनेची होळी करुन मागासवर्गीयांना आरक्षण डावलणाऱ्या सिडीसीसी बैंक अध्यक्ष व संचालकांचा निषेध केला.
सिडिसिसी बैंकेच्या उपविधीमध्ये (घटनेमध्ये ) जी 97 वी घटना दुरुस्ती करुन मागासवर्गीय समाजाचे आरक्षण बैंकेच्या नोकर भरतीत शासकीय नितमानुसार राहिलं व मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा अनुशेष भरून काढण्यात येईल अशा पद्धतीचा ठराव बैंक संचालकांनी 2013 ला घेतला होता व विभागीय सहनिबंधक नागपूर यांनी त्याला मान्यता दिली, मग बैंकेत नोकर भरती घेतांना मागासवर्गीय एससी, एसटी व ओबीसीसी आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना नोकरीमध्ये आरक्षण द्यायला हवे होते, परंतु जाणीवपूर्वक नाकारले आणि आणि प्रत्येक उमेदवार यांच्याकडून 25 ते 40 लक्ष रुपये घेऊन सर्वसामान्य गोरगरिबांच्या हुशार व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना मुलांना डावललं आहे.
पालकमंत्री अशोक उईके आंदोलनकर्त्याच्या भेटीला.
राज्यात सद्या सिडीसीसी बैंकेच्या भ्रष्ट नोकर भरतीचा मुद्दा गाजत असून मागासवर्गीय एससी, एसटी व ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण नोकर भरतीत डावलल्याने आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून मागील 2 जानेवारी पासून साखळी ठिय्या आंदोलन आणि 16 जानेवारी पासून समितीचे मनोज पोतराजे आणि 21 जानेवारी पासून रमेश काळाबाँधे आमरण उपोषण करत आहे, दरम्यान माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री अशोक उईके यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन आंदोलनकर्ते मनोज पोतराजे आणि रमेश काळबांधे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीच्या सदस्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलूनप्रश्न निकालू काढू अशी ग्वाही दिली, यावेळी माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार, आमदार देवराव भोंगळे यांच्यासह आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीचे समन्वयक राजू कुकडे, संजय कन्नावार, सूर्या अडबाले, नभा वाघमारे, अनुप यादव, राजेश बेले, आशिष ताजने, महेश वासलवार व इतर सदस्यांची उपस्थिती होती.
बैंकेने दिलेल्या नियुक्ती पत्रावर स्थगिती येणार?
सिडीसीसी बैंकेच्या अध्यक्ष व संचालकांनी भ्रष्ट मार्गाने जी नोकर भरती केली आहे व आज दिनांक 27 जानेवारीला पैसे देणाऱ्या उमेदवारांना नियुकी पत्र देऊन त्यांना ड्युटीवर सामावून घेण्याचा खेळ खेळला आहे तो सर्व संचालकांच्या अंगलट येणार असून आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत आंदोलनकर्ते यांची जी भेट होणार आहे व उच्च न्यायालयाचा जो आजच निर्णय येणार आहे ते पाहता ज्यांना बैंकेद्वारे नियुक्ती पत्र दिले त्यावर स्थगिती येणार असल्याची दाट संभावना आहे,





