अधिकार संपल्यानंतरही बेकायदेशीर रात्री नियुक्त्या करतांना बैंक प्रशासन सापडले, कारवाई होणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आंदोलनकर्ते यांना ठोस आश्वासन.
चंद्रपूर :-
सिडीसीसी बैंक मधील नोकर भरतीमध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार करुन बेकायदेशीर नोकर भरतीची होतं असल्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असतांना आता मुंबई उच्च न्यायालयात संचालक मंडळ बरखास्त करुन निवडनुका घ्या असा आदेश सहकार विभागाला दिल्यानंतर सिडीसीसी बैंकेच्या संचालक मंडळाचे अधिकार संपले आहे, मात्र ज्यांच्याकडून पैसे घेतले त्यांना नियुक्त्या दिल्या नाही तर ते संचालकांच्या घरावर मोर्चा काढेल या भीतीपोटी सिडीसीसी बैंकेचे अध्यक्ष संतोष रावत आणि संचालक मंडळ यासह बैंकेच्या भ्रष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी कल्याणकर यांनी बेकायदेशीर निवड केलेल्या उमेदवारांना नियुक्ती पत्र रात्री उशिरापर्यंत देण्यात येत असल्याचे बैंकेच्या समोर असलेल्या गर्दीवरून दिसत असल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान उच्च न्यायालयाचा जो निर्णय झाला त्यामुळे बैंकेचे अध्यक्ष संतोष रावत व इतर संचालकांना असे कुठलेही अधिकार नसताना ते कुठल्या आधारावर बोगस भरती प्रक्रिया राबवून नियुक्त्या देत आहे याविषयीं आरक्षण बचाव संघर्ष समितीचे समन्वयक राजू कुकडे यांनी जिल्हा उपनिबंधक यांना भ्रमनध्वनी वरून प्रश्न विचारला असता त्यांनी उच्च न्यायालयात नेमके काय झाले याचं डिटेल पाठवा मी कार्यवाही करतो असे सांगितले व त्यांनी ते डिटेल पाठवलं असल्याने या बेकायदेशीर नियुक्त्या देण्याच्या प्रक्रियेवर जिल्हा उपनिबंधक व विभागीय सहनिबंधक हे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
सिडीसीसी बैंकेच्या बोगस नोकर भरती विरोधात आरक्षण बचाव संघर्ष समितीच्या वतीने मनोज पोतराजे हे मागील 12 दिवसापासून आमरण उपोषण करत आहे तर रमेश काळबांधे हे मागील 7 दिवसापासून आमरण उपोषण करत आहे, या आंदोलनाला राज्याचे माजी अर्थमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचासंह जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री अशोक उईके यांनी सुद्धा भेट देऊन सिडीसीसी बैंकेसमोर सुरु असलेल्या उपोषण आंदोलन मंडपाला भेट देऊन बैंकेच्या या भ्रष्ट नोकर भरतीवर स्थगिती आणू असे आश्वासन दिले आहे, परंतु प्रत्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकू व माजी मंत्री शोभाताई फडणविस ह्या या नोकर भरतीवर स्थगिती येऊ नये म्हणून शासनाकडे व विशेष करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कांग्रेस नेते संतोष रावत यांना संरक्षण मिळावे यासाठी लांबीग करत असल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे, मात्र सिडीसीसी बैंकेचे संचालक मंडळं बरखास्त झाल्यानंतर सुद्धा त्यांनी कायदा हातात घेऊन बेकायदेशीरपणे नियुक्ती पत्र बैंकेच्या मुख्य कार्यालयात रात्री उशिरापर्यंत उमेदवारांना वाटप करत असल्याने या नोकर भरतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्थगिती देणारं असल्याची माहिती आहे.
नियुक्ती पत्र घेण्यासाठी उमेदवारांची बैंकेसमोर रात्री उशिरापर्यंत गर्दी?
आज नियुक्ती पत्र दिले नाही तर उद्या आपल्याला अधिकार राहणार नाही यामुळे नियुक्ती पत्र रात्री उशिरापर्यंत देण्याचा सपाटा बैंकेचे भ्रष्ट अध्यक्ष संतोष रावत, संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश्वर कल्याणकर यांनी चालवला असल्याने बैंकेच्या मुख्यालयासमोर रात्री उशिरापर्यंत उमेदवारांची तोबा गर्दी झाली असल्याचे चित्र आहे, दरम्यान नियुक्त झालेले सर्व बैंक कर्मचारी यांच्या नोकऱ्या केवळ काही दिवसासाठी राहणार असून मंत्रालयातील आदेशाने त्यांना कामावरून लवकरच कमी कारण्यात येईल अशी शक्यता आहे.
मुख्यमंत्री देणारं सिडीसीसी बैंकेच्या नोकर भरतीला स्थगिती
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकर भरती प्रक्रियेतून आरक्षण रद्द केल्याप्रकरणी आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीच्या वतीने मनोज पोतराजे व रमेश काळबांधे यांचे मागील अनुक्रमे 12 व 7 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. या संदर्भात आज आरक्षण बचाव संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे सविस्तर चर्चा केली, यावेळी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दाखवत हे सरकार आरक्षण विरोधी धोरण सहन करणार नसून लवकरच हा प्रश्न निकाली लावू असे सांगत या नोकर भरतीवर स्थगिती आणू असे आश्वासन दिले आहे.





