संचालक मंडळाची आज महत्वपूर्ण सभा वादळी ठरणार, निवड समितीवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता.
चंद्रपूर :-
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेच्या 360 पदासाठी झालेल्या परीक्षेत मोठा घोळ झाला असताना व मागासवर्गीय समाजातील मुलांना आरक्षण डावलल्याने ही नोकर भरती पूर्णतः वादात सापडली आहे, अशातच सिडीसीसी बैंकेच्या या नोकर भरती विरोधात आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीचे पदाधिकारी सदस्य आंदोलन करत आहे, मागील 2 जानेवारी पासून ठिय्या आंदोलन ते 16 जानेवारी पासून मनोज पोतराजे व 21 जानेवारी पासून रमेश काळबांधे हे आमरण उपोषण करत आहे, त्यामुळे बैंकेच्या या नोकर भरतीवर स्थगितीचे ढग जमा झाल्याचे दिसत असतांना आता आज होणाऱ्या संचालकांच्या सभेत पात्र उमेदवार यांची निवड कारण्याचं काम होणार असल्याचे व निवड यादी जाहीर केल्या जाण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी कार्यकर्ते व सामान्य जनतेचे लक्ष लागून आहे, दरम्यान या सभेत ज्यांची निवड करण्यात आली त्यांना मिळालेले गुण किती आहे आणि मुलाखती मध्ये त्यांना किती गुण दिल्या गेले याचा लेखाजोखा मांडावा यासाठी बैंकेचे माजी अध्यक्ष मनोहर पाऊणकार यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी कल्याणकर यांना दिलेल्या पत्रातून मागणी केली आहे.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेच्या नोकर भरती परीक्षेत घोळ करुन हुशार परीक्षार्थी यांना कमी गुण दाखवले व ज्यांनी 25 ते 40 लाख रुपये दिले त्यांना मुलाखतीत बोलावले असल्याने 100 कोटी पेक्षा मोठा नोकर भरती घोटाळा बैंक अध्यक्ष संतोष रावत, संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी, आयटीआय कंपनी सिइओ यांनी केल्याने यांच्या गैरव्यवहाराची चौकशी करुन त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे अशी मागणी होत असतांना आता 360 पदभरती ची यादी व प्रतीक्षा यादी जाहीर होणार असल्याने आजच्या संचालकांच्या सभेत काय वादळ उठतेय ते पाहणे ऑस्तुक्याचे ठरणार आहे.
ह्या नोकर भरतीच्या निवड समितीवर गुन्हे दाखल होणार?
चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बैंकेत सन 2013 ला अशीच एक भरती घेण्यात आली होती व त्यावेळी या नोकर भरतीची परीक्षा एम.के.सी. एल या कंपनीने ऑनलाईन पद्धतीने घेतली होती, मात्र त्यावेळी सुद्धा नोकर भरतीत घोटाळा झाला होता व तत्कालीन बैंकेचे अध्यक्ष शेखर धोटे, संचालक प्रभाताई वासाडे, ललित मोटघरे, रवींद्र शिंदे, रामू जाधव, नंदा अल्लूरवार तसेच बैंकेचे तत्कालीन मुख्याधिकारी विजय खेडकर, निवड समितीचे सदस्य समाजकल्याण निरीक्षक लक्ष्मीकांत पाटील, तत्कालीन सहाय्यक प्रकल्प अधिकारी अशोक वाहने, तत्कालीन जिल्हा उपनिबंधक मदन अहिर व एम.के.सी.एल कंपनीच्या अधिकाऱ्यावर कलम 93(1) (ड) 13,(2) लाचलुचपत प्रतिबंधक कायदा 1988 सह कलम 420, 109 कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते. दरम्यान आता तशीच परिस्थिती निर्माण झाली असून बैंक अध्यक्ष संतोष रावत आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश्वर कल्याणकर यांनी निवड समितीत बाहेरील अधिकारी न घेता बैंकेतीलचं अधिकारी यांच्या माध्यमातून नोकर भरतीच्या मुलाखती घेतल्याने या नोकर भरतीत मोठा भ्रष्टाचार होत असल्याचे समोर येत आहे, त्यामुळे आज होणाऱ्या संचालकांच्या सभेत काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
सिडीसीसी बैंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कल्याणकर यांच्यावर अगोदरच गुन्हे दाखल?
औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेत पदावर असतांना राजेश्वर कल्याणकर यांच्यावर दोन गंभीर गुन्हे दाखल आहे, मात्र सिडीसीसी बैंकेची नोकर भरती घेण्यापूर्वी बैंकेच्या सिइओ पदावर गंभीर गुन्हे दाखल असलेले राजेश्वर कल्याणकर यांची एप्रिल 2021 ला नियुक्ती केली होती, जणू त्यांना भ्रष्टाचार करण्याचा अनुभव असल्याने त्यांची निवड करण्यात आली कां हा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे, कारण औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेचे अधिकारी तुपे यांनी यापूर्वी बैंकेचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांना कागदपत्रासह सविस्तर माहिती देऊन कल्याणकर यांच्यावर दाखल गुन्ह्याचा तपसील दिला होता मात्र कुठलीही नियुक्ती देतांना संबंधित अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल आहे कां? याबद्दल पोलीस सत्त्यापन द्वारे माहिती करुन घायची असतें मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी कल्याणकर यांच्यावर बैंक कर्ज घोटाळा संदर्भात संघटित दोन गुन्हे दाखल असल्याने सिडीसीसी बैंकेत सर्व भ्रष्टाचारी भरले कां? याचे आश्चर्य वाटतं आहे.




