अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी
मनपा प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
येथील माजी नगरसेवक जिल्हाध्यक्ष महानगर भाजपा,चंद्रपूर तथा माजी उपमहापौर,स्थायी समिती अध्यक्ष असूनही या रस्त्याची दुर्दशा कायम…
चंद्रपूर :- चंद्रपूर महानगर पालिकेने बांधलेल्या जगन्नाथ बाबा मंदिराजवळील रस्त्याची इतकी खराब दुरवस्था झाली आहे की,तिथे आता एकादा नाही तर नेहमीचे अपघाताचे ठिकाण बनले आहे.
नुकतेच बांधण्यात आलेल्या सीमेटीकरण रोडाची दुर्दशा या अवस्थेत आलेली आहे, की या रस्त्यावर भेगा व खडे तर सोडाच ( दरारी ) म्हणजेच या रोडवरील जे दोन पदरी सीमेटीकरण रोड बनवल्या जात असतात त्या दोन पदरी मधून एक रोड डाव्या बाजूला तर एक रोड उजव्या बाजूला गेलेला आहे,
म्हणजे या दोन पदरी रोड च्या मधल्या भागात खूप मोठी एक दरार निर्माण झाली असून, हा रोड अर्धा ठेकेदार आणि अर्धा कमिशन चोर आणि मधातला उर्वरित नागरिकाच्या जीवाच्या अपघातासाठी निर्माण झालेला आहे असे उदाहरण दिसत आहे,
यामुळे येथील नागरिकांसाठी अपघाताचा मोठा धोका निर्माण झालेला असून इथे एकही असा दिवस नाही की अपघात होणार नाही आणि यास कारणाने आज दि,28,08,2024,ला पुन्हा एक गरीब मजदूर आपल्या कामासाठी जात असता त्याच्या या रस्त्यावर अपघात होवून खूप दुखापत झाली आहे, तरी येथिल माजी नगरसेवकाचे लक्ष का जात नाही आहे,येथील नागरिकांना प्रश? पडला आहे,
जणू कंत्राटदारांना दर्जाशी तडजोड करण्याची मुभा देत पालिका प्रशासन आणि स्थानिक नगरसेवकांच्या योग्य देखरेखीशिवाय हा रस्ता तयार करण्यात आला.की काय? कारण येथील माजी नगरसेवक येथील रहिवासी असून जिल्हाध्यक्ष महानगर भाजपा,चंद्रपूर तथा माजी उपमहापौर,स्थायी समिती अध्यक्ष असूनही या रस्त्याची दुर्दशा कायम असल्याने सर्वाना प्रश्न? पडला आहे,
इतकेच नाही तर यांच्या या दुर्लक्षनामुळे हा रस्ता खचू लागला असून, खड्डे,भेगा व रोड मध्ये पडलेली दरारी अपघाताचे मुख्य कारण बनले आहे,
आता सध्या लहान मोठा अपघात होत आहे परंतु मनपा प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी व येथील माजी नगरसेवक मोठी दुर्घटना घडण्याची वाट पाहत आहेत का? असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे,
आता पालिका प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी व माजी नगरसेवक दुर्लक्ष देणार की या सिमेंट काँक्रीट रोडाचे लवकरात लवकर निवारण करण्यात येईल या कडे नागरिकांचे लक्ष लागले आहे, रस्त्याची दुरवस्था चिंतेची बाब बनली असून, पुढील अपघात टाळण्यासाठी तातडीने रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी येथील नागरिक करत आहेत.




