Home चंद्रपूर पोलीस विभागाच्या सहकार्याने जादूटोणाविरोधी कायदा अनिसचे मार्गदर्शन

पोलीस विभागाच्या सहकार्याने जादूटोणाविरोधी कायदा अनिसचे मार्गदर्शन

वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावर चमत्कार भंडाफोड

गोंड़पिपरी प्रतिनिधि : –

गोंडपीपरी तालुक्यातील लाठी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सकमुर या गावात पोलीस विभागाच्या सहकार्याने जादूटोणाविरोधी कायदा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावर चमत्कार भंडाफोड़ प्रात्यक्षिकांसह सभा घेण्यात आली .

या सभेत तंत्र मंत्र, जादूटोणा ,करणी ,भानामती बुवाबाजी, देवी अंगात येणे, जादूटोणा विरोधी कायदा आदी विषयांवर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक अनिल दहागावकर, जिल्हा सचिव धनंजय तावाडे, लाठी पोलीस ठाण्याचे ठाणेदार . पराडकर यांनी गावकऱ्यांना मार्गदर्शन केले . तसेच गावात जादूटोणाविरोधी कायद्याची माहिती व प्रबोधन करून पत्रके देण्यात आली.