Home चंद्रपूर महाराष्ट्र दिनांचे औचित्य साधून मनसे वाहतूक सेनेतर्फे रुग्णवाहीकेचे लोकार्पण

महाराष्ट्र दिनांचे औचित्य साधून मनसे वाहतूक सेनेतर्फे रुग्णवाहीकेचे लोकार्पण

मनसे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष महेश वासलवार यांचा उपक्रम, राज्य उपाध्यक्ष सुधीर खापणे यांच्या हस्ते लोकार्पण,

चंद्रपूर :

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दरवर्षी महाराष्ट्र दिनांचे औचित्य साधून जनहिताचे वेगवेगळे उपक्रम राबवून राबविले जातात, दरम्यान यावर्षी महाराष्ट्र दिनी मनसे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार यांनी जिल्ह्यातील गोरगरीब जनतेला पक्षाच्या माध्यमातून आरोग्य सुविधा जलद गतीने मिळावी याकरिता एका रुग्णवाहिकेचे लोकार्पण वाहतूक सेना राज्य उपाध्यक्ष सुधीर खापणे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी मनसे उपजिल्हाध्यक्ष राजू कुकडे, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, उमाशंकर तिवारी, जनहित कक्ष विभागाचे जिल्हाध्यक्ष रमेश काळबांधे, सुनील गुढे, रोजगार स्वयंरोजगार विभागाचे जिल्हाध्यक्ष मनोज तांबेकर, पियुष धुपे, वर्षा भोमले, कल्पना पोतर्लावार इत्यादीची उपस्थिती होती.

मनसे वाहतूक सेनेतर्फे स्थानिक श्रीराम वार्ड येथील मनसे जनहीत कक्ष विभागाचे जिल्हाध्यक्ष रमेश काळबांधे यांच्या जनसंपर्क कार्यालयात हा रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा साजरा करण्यात आला, रुग्ण सेवा ही सर्वोच्य सेवा असून रुग्णाला वेळेवर उपचार मिळाला नाही तर ते दगावतात परंतु कुणाही रुग्णांचा अपघाती मृत्यू होऊ नये किमान रुग्णांला वेळेवर उपचार मिळावा याकरिता जनसेवेकरिता मी हे रुग्णवाहीका जनतेला समर्पित केल्याची भावना वाहतूक सेनेच्या पदाधिकारी यांनी व्यक्त केली, यावेळी रुग्णवाहिकेला सजवून पूजा करण्यात आली आणि मनसे वाहतूक सेना राज्य उपाध्यक्ष सुधीर खापणे यांनी नारळ फोडून रुग्णवाहीका रुग्णांना समर्पित करण्यात आली