तीन गावातील शेकडो महिला पुरुष यांनी घेतला मनसेत प्रवेश, सरपंच मनसेचाच होणार असल्याची गावाकऱ्यांनी दिली ग्वाही.
चंद्रपूर :-
जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार हे कामगार क्षेत्रात काम करतं असतांना पक्ष मजबुती करिता पक्षाच्या शाखा पण तयार करतं आहे, दरम्यान चंद्रपूर तालुक्यातील वेकोली द्वारे पुनर्वसित गाव असलेल्या सिनाळा या गावासह इतर गाव एकत्र करून नवीन सिनाळा हे गाव वसवलं तिथे युवकांना घेऊन मनसे पक्षाची शाखा उघडण्यात आली, यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांचेसह मनसे चे उप जिल्हाध्यक्ष राजू कुकडे, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, जनहीत कक्ष विभाग जिल्हाध्यक्ष सुनील गुढे, राज वर्मा, महिला सेना बल्लारपूर तालुका अध्यक्ष कल्पना पोतर्लावार व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
वेकोली कोळसा खाणी करिता येथील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी गेल्या, त्यांची घरे गेली पण पूर्णतः प्रकल्पग्रस्त म्हणून वेकोली प्रशासनाने नोकऱ्या दिल्या नाही पर्यायाने इथे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली, येथील नागरिकांचे मतदान घेतले जाते पण त्यांच्या अधिकारासाठी कोणी लढताना दिसतं नाही म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा लढवय्या राजकीय पक्षात आम्ही पक्ष प्रवेश करतं आहो अशा प्रतिक्रिया गावातील नवयुवकांनी व महिलांनी दिल्या यावेळी सिनाळा गावातील शाखा पदाधिकारी राहुल डोंगे. शुभम रत्नपारखी. सुरज धुर्वे. अजय ठाकरे. विवेक राऊत. निखिल ठुस्से. सुरज रामटेके. यश रत्नपारखी.अनिकेत नींदेकर. अक्षय मडावी. कुमार ठाकरे. धिरज रामटेके. मनोज राऊत. प्रितम मडावी. अनिल सोनुले. प्रविण रायपुरे. ईश्वर रामटेके. सुरज वानखेडे. पियु गार्गीलवर. सुधीर करमणकर इत्यादीची उपास्थिती होती तर महिला सेनेच्या शाखा पदाधिकारी प्रणाली रत्नपारखी. काजल धुर्वे. दिक्षा धुर्वे. मंगला रत्नपारखी. माया मडावी. सुनंदा डोंगे. जलिता ठाकरे. अनिता ठाकरे यांच्या सह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




