Home चंद्रपूर लक्षवेध :- चंद्रपूरात मुनगंटीवार–जोरगेवार वाद कशासाठी?

लक्षवेध :- चंद्रपूरात मुनगंटीवार–जोरगेवार वाद कशासाठी?

माजी नगरसेवक अजय सरकार यांच्या माहितीनुसार आमदार जोरगेवार यांचेवर 420 चा गुन्हा खरंय का ?

चंद्रपूर : –

भाजपच्या स्थापना दिनानिमित्त ६ एप्रिल रोजी शहरात आयोजित कार्यक्रमांमुळे पक्षातील अंतर्गत मतभेद उघडपणे समोर आले होते, माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला, दरम्यान मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली गांधी चौक येथे ‘संकल्प ते सिद्धी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात तब्बल १६३० कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचा दावा करण्यात आला. मात्र या आकड्यावरच जोरगेवार यांनी उघडपणे शंका उपस्थित करत, “इतक्या मोठ्या संख्येने पक्षप्रवेश झाला असेल तर ती आनंदाची बाब आहे; परंतु संबंधित यादी पक्षाच्या यंत्रणेकडे आलेली नाही,” असे एकलेचे तारे तोडले.

खरं तर आमदार जोरगेवार हे पक्षाचे आमदार असले तरी पक्ष संघटनेच पद त्यांच्याकडे वा त्यांच्या समर्थकाकडे नाही आणि ज्या व्यक्तीच्या भरोशावर पक्ष उभा राहिला, एवढंच नव्हे तर त्यांच्या पुण्याईने जोरगेवार आमदार झाले त्या भाजपच्या लोकनेत्याला पक्ष प्रवेशाची यादी मागणे व ती यादी संघटनेकडे पाठवली नसल्याचे बोलणे म्हणजे जोरगेवार यांचा लहान तोंडी मोठा घास म्हणावा लागेल, कारण भाजप जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा स्वतः गांधी चौकातील कार्यक्रमात त्यावेळी उपस्थित होते, खरं तर स्वतःचे कर्तृत्व शून्य असतांना केवळ मुख्यमंत्र्यांच्या दयेवर चंद्रपूर विधानसभेतील भाजप माझ्याकडे आहे असला भ्रम पसरविणे हे जोरगेवार यांचे बालिशपणाचे लक्षण आहे, कारण ज्यांनी पक्षाचे पायेमुळे रोवली त्या मुनगंटीवारांना आव्हान देणे म्हणजे स्वतःचं अस्तित्व संपविण्यासारखं आहे हे जोरगेवार यांनी समजून घेणे जरजेचे आहे.

चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत पक्षाचे अधिकृत उमेदवार डावलून स्वतःच्या मर्जीतील उमेदवार निवडल्याने जोरगेवार समर्थक सुभाष कासनगोट्टूवार यांना शहर अध्यक्ष पद गमवावं लागलं, दरम्यान यामुळे मोठ्या प्रमाणात बंडाखोरी होऊन भाजपला बहुमत गाठता आलं नाही, त्याचं खापर खरं तर आमदार जोरगेवार यांच्या डोक्यावर फोडून वरिष्ठाना याबाबत अवगत करायला हवं होतं की आमदार म्हणून जोरगेवार यांची भूमिका पक्ष विरोधी आहे, मात्र तसें न करता भाजप नेते मुनगंटीवार यांनी आपले राजकीय चातुर्य दाखवून भाजप चा महापौर मनपा मध्ये बसवला ही एक उपलब्धी आहे, मात्र आपलं अस्तिव राखण्यासाठी जोरगेवार यांनी चालवलेली बोलबच्चन रणणिती त्यांच्यावरच उलटण्याची जास्त शक्यता दिसतं आहे.

खरं तर सुधीर मुनगंटीवार हे तरुण वयापासून भाजपमध्ये सक्रिय राहिले असून त्यांना मंत्रिपदापासून वंचित ठेवल्या नंतर सुद्धा त्यांच्या पक्षनिष्ठेबाबत कधीही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले नाही उलट, विविध पक्षांतून प्रवास करत भाजपमध्ये आलेल्या जोरगेवार यांनी पक्षनिष्ठेवर भाष्य केल्याने जोरागेवाr यांनी आम्हाला पक्षनिष्ठा शिकवू नये अशी कार्यकर्त्यांची भूमिका व्यक्त होत असल्याचे बोलले जात आहे. भाजप वर्धापन दिनी मुनगंटीवार यांच्या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्षांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते, तर जोरगेवार यांच्याकडे कोणतेही etसंघटनात्मक पद नसतानाही त्यांनी आमचाच कार्यक्रम अधिकृत असल्याचा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

चंद्रपूर विधानसभेत उमेदवारी कुणाला?

भाजप वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर जोरगेवार यांनी २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत चंद्रपूरमधून आपणच उमेदवार असणार असल्याचे जाहीर केले. “चंद्रपूरकरांनी सलग दोन वेळा मला निवडून दिले आहे,” असे सांगत त्यांनी आगामी राजकीय लढाईची दिशा स्पष्ट केली. दरम्यान, भाजपकडून चंद्रपूर जिल्हा प्रभारीपदी सुधीर मुनगंटीवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार ही नियुक्ती झाल्याचे सांगितले जात आहे. या निर्णयामुळे ‘मिशन चंद्रपूर’साठी पक्षाने मुनगंटीवार यांच्यावर पुन्हा विश्वास टाकल्याचे स्पष्ट झाले आहे.

आमदार जोरगेवार यांचेवर 420 चा गुन्हा?

भाजप माजी नगरसेवक अजय सरकार यांनी कागदापत्रासह दावा केला की जोरगेवार यांच्यावर नागपूर येथील बजाज नगर पोलीस स्टेशन मध्ये 420 चा गुन्हा दाखल आहे, ज्या अर्थी अजय सरकार यांचेवर गुंड आल्याचा आमदार जोरगेवार हे आरोप करत असतील तर जोरगेवार हे फोरट्वेंटी चारसोबीस आहेत हे पण बिरूद त्यांना लागू शकतं, त्यामुळे भाजप मध्ये ज्या पद्धतीन एकमेकांवर कुरघोडी केली जात आहे ती पक्ष संघटनेला घातक ठरत आहे.