उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे हेच यामधील खरे आरोपी असल्याची गोपनीय सूत्रांची माहिती?
RTO चा पंचनामा भाग -21
चंद्रपूर-तेलंगणा सीमेवरील लक्कडकोट (Lakkadkot) आरटीओ चेकपोस्टवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) सोमवारी (२३ मार्च २०२६) मोठी कारवाई केली. ५०० रुपयांची लाच स्वीकारताना आरटीओ अधिकाऱ्यांच्या खासगी एजंटला रंगेहाथ पकडण्यात आले, ज्यामुळे वाहतूक विभागात खळबळ उडाली आहे, या प्रकरणात मोटार वाहन निरीक्षक पोटदुखे आणि पांडे हे लाचखोर अधिकारी अजूनही फरार असल्याची माहिती आहे, मात्र यामध्ये उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे हेच आरटीओ सिमा नाक्यावर अवैध वसुली चे सूत्रधार असल्याने त्यांनी आपल्या दोन्ही मोटार वाहन निरीक्षकांचा बचाव करण्याचा प्रयत्न चालवला असल्याचे बोलल्या जात आहे.
आरटीओ च्या लक्कडकोट, (चंद्रपूर-तेलंगणा सीमा नाका) येथे ट्रकचालकाकडून कागदपत्रे तपासणीच्या नावावर आरटीओ अधिकाऱ्यांच्या खाजगी एजंटकडून अवैध ‘एन्ट्री’ मागण्यात आली होती, दरम्यान नागपूर एसीबीच्या पथकाने सापळा रचून ५०० रुपयांची लाच घेताना त्या एजंटला पकडले, मात्र तिथे कार्यरत मोटार वाहन निरीक्षक पोटदुखे आणि पांडे हे अधिकारी भीतीने तिथून पळून गेले, मात्र त्यांचेवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, सीमा तपासणी नाक्यांवर होणाऱ्या अशा लाचखोरीमुळे ट्रकचालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यापूर्वीही या सीमा नाक्यावर याचं उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या अवैध वसुली बाबत अमरावती एसीबी टीम ने कारवाई करून शिवाजी विभुते या मोटार वाहन निरीक्षक यांचेसह एका खाजगी एजंट ला 500 रुपयाची लाच घेतांना रंगेहात केली होती,
काय आहे नक्की प्रकरण?
कांग्रेस नेते तथा विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार यांनी आरटीओ तपासणी सिमा नाक्यावर एसीबी च्या कार्यवाहीला सुनियोजित कट कारस्थान असल्याचे पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले व मोटार वाहन निरीक्षक पवन पोटदुखे हे आपल्या नव्या आरटीओ अधिकारी यांच्या हक्कासाठी लढत असल्याने व त्यांनी काही मोठे आरटीओ अधिकारी आणि निलंबित अधिकारी यांच्या दबावतंत्राला न जुमानता आपली लढाई सुरु ठेवल्याने त्याचं अधिकाऱ्यांनी ही एसीबी ची कारवाई करायला लावली असे म्हटले आहे, पण वस्तुस्थिती फार वेगळी असून चंद्रपूर प्रादेशिक परिवहन अधिकारी इथे किरण मोरे यांनी ज्या पद्धतीने आपली सत्ता चालवली आहे व मोटार वाहन निरीक्षक पोटदुखे आणि पांडे व इतर नवीन अधिकारी यांना सोबत घेऊन जुन्या अधिकाऱ्यांचं महत्व कमी केलं आहे त्यावरून हे कारस्थान रचलं गेलं असल्याचं स्पष्ट होतं आहे, अर्थात यासाठी किरण मोरे खरे आरोपी आहेत अशी गोपनीय सूत्रांची माहिती आहे.
काय नागपूर एसीबी ची कारवाई चुकीची आहे?
चंद्रपूर-तेलंगणा सीमा नाका लक्कडकोट येथे जी नागपूर एसीबी ची धाड पडली व त्यात 500 रुपयाची लाच घेतांना आरटीओ अधिकारी यांचा खाजगी एजंट विलास विठोबाजी देशमुख हा पकडला गेला ही वस्तुस्थिती आहे, खरं तर नवीन मोटार वाहन निरीक्षक यांना हाताशी धरून किरण मोरे यांनी जास्तीत जास्त पैसे आपल्याकडे कसे येईल यासाठी रणणिती वापरली आहे, त्यामुळे जुने अधिकारी हे नाराज आहेत, त्यांनीच ही धाड टाकायला लावली असावी असा संशय आहे, जर अवैध वसुली चा जास्तीचा पैसा एकाकडेच जाईल तर कुणीही अधिकारी हे सहन करणार नाही आणि किरण मोरे यांची गडचिरोली येथे बदली झाली असतांना न्यायालयीन सर्कस करून त्यांनी पाच वर्षांपासून धनावर बसलेल्या सापासारखी जी कुंडली मारली आहे त्याबद्दल कुणी लोकप्रतिनिधी का बोलतं नाही याचे आश्चर्य वाटते. अर्थात नागपूर एसीबीने केलेली कार्यवाही ही निश्चितपणे अवैध वसुली वर प्रहार आहे आणि लाखों वाहन धारक यामुळे सुखावले असल्याचे चित्र दिसत आहे.
किरण मोरे वर गुन्हे दाखल करण्याची मनसेची मागणी.
मागील पाच वर्षांपासून चंद्रपूर आरटीओ कार्यालयात आपली तानाशाही चालविणारे व त्यांच्या भ्रष्टाचार विरोधात कुणी तक्रार केली किंव्हा कुण्या पत्रकारांनी बातम्या प्रकाशित केल्या तर त्यांच्या विरोधात खंडणी मागितली म्हणून पोलिसांत तक्रार देणे व त्यांचेवर गुन्हे दाखल करणे हा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांचा खेळ सुरु आहे, तेलंगना सीमेच्या आरटीओ नाक्यावर वाहन धारकांकडून अवैध वसुली यांच्याच मार्गदर्शनाखाली सुरु आहेत त्यामुळे एसीबी नागपूर टीम ने किरण मोरे यांच्यावर या प्रकरणी गुन्हे दाखल करावे अशी मागणी मनसे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष महेश वासलवार यांनी नागपूर एसीबी पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे.




