Home चंद्रपूर ब्रेकिंग :- महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील लक्कडकोट आरटीओ चेकपोस्टवर एसीबीची धाड.

ब्रेकिंग :- महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील लक्कडकोट आरटीओ चेकपोस्टवर एसीबीची धाड.

दोन आरटीओ निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांचा सहभाग असल्याने त्यांना अटक करावी अशी होत आहे मागणी.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे राज्याचे परिवहन आयुक्त यांच्याकडे महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील लक्कडकोट आरटीओ चेकपोस्टवर वाहन धाराकांकडून अवैध वसुली होत असल्याने यासाठी जबाबदार उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे आणि तत्कालीन सहाय्यक प्रादेशिक अधिकारी आनंद मेश्राम यांच्यावर चौकशी करून निलंबानाची कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली होती व त्या संदर्भात मनसे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार हे याबाबत पुरावे सादर करणार होते मात्र त्या आधीच आज दिनांक 23 मार्च 2026 ला नागपूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) लक्कडकोट सिमा नाक्यावर धाड टाकून पांडे आणि पोटदुखे या दोन आरटीओ निरीक्षक यांना रंगेहाथ अटक केली. या कारवाईमुळे परिवहन विभागात एकच खळबळ उडाली असून, शिवाजी विभुते या मोटार वाहन निरीक्षक याला अमरावती एसीबी ने अटक केल्यानंतर पुन्हा एकदा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांची ‘वसुली’ समोर आली आहे, दरम्यान आता किरण मोरे यांची प्रमुख भूमिका असल्याने त्यांना तत्काळ अटक करावी अशी मागणी होत आहे.

चंद्रपूर प्रादेशिक परिवहन कार्यालयात मागील अनेक वर्षांपासून भ्रष्टाचाराच्या सर्वं सिमा ओलांडणारे आणि तेलंगना सिमा नाक्यावर आपली स्वतंत्र यंत्रणा चालविणारे किरण मोरे यांची गडचिरोली येथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून बदली झाल्यानंतर सुद्धा त्यांनी चंद्रपूर चा पदभार सोडला नाही, इथे दर महिन्याला 50 लाखांच्या वर अवैध वसुलीचा हिस्सा मिळविण्यासाठी त्यांनी स्वतःची स्वतंत्र यंत्रणा कामी लावली त्यात लक्कडकोट सिमा नाका सुद्धा समाविष्ट आहे, दरम्यान एक वर्षापूर्वी याच चेकपोस्टवर ट्रक चालकाकडून लाच घेताना शिवाजी विभूते या मोटर वाहन निरीक्षक यांचेसह एक खाजगी एजंट ला अमरावती एसीबी पथकाने रंगेहाथ अटक केली होती, या प्रकरणात आपले नाव येऊ नये म्हणून याचं किरण मोरे आणि आनंद मेश्राम या आरटीओ अधिकाऱ्यांनी अमरावती एसीबी ला 50 लाख रुपये दिल्याची चर्चा होती, मात्र आता ज्या मोटार वाहन निरीक्षक पोटदुखे व पांडे या अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली त्यात किरण मोरे यांना अटक करण्यात यावी अशी मागणी होत आहे.