मुस्लिम समाजाला दिशा देणारे उपक्रम राबविल्याने समाजाचा विश्वास वाढला असल्याचे संकेत….
चंद्रपुर प्रतिनिधी :-
जिल्ह्याच्या सामाजिक चळवळीत मुस्लिम समाजाला पुढे आणणारे आणि नुकत्याच झालेल्या महानगरापालिकेच्या निवडणुकीत सामाजिक एकता निर्माण करून स्वतःच्या हक्काचा नगरसेवक स्वतःच्या प्रभागात निवडून आणणारे हबीब मेमन यांना जिल्ह्यात मुस्लिम समाजाचे सर्वात मोठे सामाजिक संघटन असलेल्या मुस्लिम एकता बहुउद्देशीय मंचच्या अध्यक्ष पदी चौथांद्या बनविण्यात आल्याने मुस्लिम समाजात त्यांचेवर मोठा विश्वास वाढल्याचे संकेत मिळत असून मुस्लिम समाज बांधवाकडून त्यांचेवर शुभेच्छांचा वर्षाव होतांना दिसत आहे.
चंद्रपुरात मुस्लिम एकता बहुद्देशीय मंच ची आम सभा दिनांक 15 फेब्रुवारी 2026 ला मसीहा सेलिब्रेशन हॉल, बिनबा गेट येथे संपन्न झाली, दरम्यान यावेळी संस्थेच्या कामकाजाची आणि प्रगतीची समीक्षा करण्यात येऊन नवी कार्यकारिणी गठीत करण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी अत्यंत शांततामय वातावरणात निवड प्रक्रिया सुरु झाली आणि यावेळी सुद्धा उपस्थित संस्थेच्या सदस्यांनी हबीब मेमन यांना सर्वसम्मतीने अध्यक्ष बनविण्यावर शिक्कामोर्तब केले, संस्थेच्या सतत चौथ्यांदा अध्यक्ष पदी हबीब मेमन यांच्या नियुक्तीने संस्थेचे कामकाज त्यांच्या नेतृत्वात योग्य पद्धतीने होतात यावर आता सर्वांची सहमती झाल्याचे दिसलें, यावेळी उपाध्यक्ष नासिर खान, सचिव अब्दुल हमीद, संयुक्त सचिव नाहिद हुसैन, कोषाध्यक्ष अब्दुल खालिक तथा कार्यकारिणी सदस्य बापू अंसारी, सईद शेख, अब्दुल वहाब अब्दुल नवाब, मोहम्मद फारुक अब्दुल हमीद, सैयद मुश्ताक (बाबा) हकीम, फारुक सिद्दीकी यांची उपस्थिती होती.




