
लाडकी बहिणीसाठी खुशखबर! e-KYC पोर्टल सुरू
राज्यातील लाडकी बहिण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. शासनाने अधिकृत e-KYC पोर्टल सुरू केले असून आजपासून लाभार्थींना ऑनलाइन पद्धतीने e-KYC पूर्ण करता येणार आहे.
:- शासनाच्या या निर्णयामुळे महिलांना वारंवार कार्यालयाचे फेरे मारण्याची गरज उरणार नाही. आता घरबसल्या मोबाईल किंवा संगणकाच्या माध्यमातून e-KYC प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. अपूर्ण e-KYC मुळे अनेक लाभार्थींचे हप्ते प्रलंबित होते. मात्र, पोर्टल सुरू झाल्याने लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
News reporter :- अतुल दिघाडे
e-KYC का आवश्यक?
- योजनेतील लाभ योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी
- आधार क्रमांक पडताळणीसाठी
- बँक खात्याची खात्री करण्यासाठी
- बनावट नोंदी टाळण्यासाठी
लाडकी बहिण e-KYC कशी करायची? (स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन)
1️⃣ अधिकृत पोर्टलवर जा (शासनाने जाहीर केलेल्या वेबसाईटवर लॉगिन करा).
2️⃣ लाभार्थी क्रमांक / आधार क्रमांक टाका.
3️⃣ नोंदणीकृत मोबाईलवर आलेला OTP प्रविष्ट करा.
4️⃣ आधार पडताळणी पूर्ण करा.
5️⃣ आवश्यक माहिती तपासून ‘Submit’ बटणावर क्लिक करा.
6️⃣ यशस्वी e-KYC नंतर कन्फर्मेशन मेसेज येईल.
आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- नोंदणीकृत मोबाईल क्रमांक
- बँक खाते तपशील
सूचना:
- OTP दुसऱ्या कुणालाही सांगू नका.
- सायबर कॅफे किंवा CSC सेंटरवरूनही प्रक्रिया करता येईल.
- अडचण आल्यास संबंधित तालुका/महानगरपालिका कार्यालयाशी संपर्क साधा.
शासनाच्या या निर्णयामुळे हजारो महिलांना दिलासा मिळणार असून प्रलंबित हप्ते लवकरच खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. लाभार्थींनी त्वरित आपली e-KYC पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.





