Home चंद्रपूर पंचनामा :- चंद्रपुरातील मनपा महापौर पदासाठी काँग्रेस नगरसेवकांच्या पळवापळवीचा नवा ट्वीस्ट?

पंचनामा :- चंद्रपुरातील मनपा महापौर पदासाठी काँग्रेस नगरसेवकांच्या पळवापळवीचा नवा ट्वीस्ट?

वडेट्टीवार -धानोरकर यांच्या वादात मनपा महापौर विकासाच्या नावावर भाजपचा होण्याची शक्यता?

चंद्रपूर:-

महानगरपालिकेत माझाच महापौर बसावा यासाठी कांग्रेसचे दोन धुरंदर भाऊ आणि ताई आपल्या समर्थकांच्या जीवावर अंतिम लढाई जिंकण्यासाठी आपल्याच कांग्रेस नगरसेवकांची पाळवापळवी करत असतांना आरोप प्रत्यरोप होतं आहे, दरम्यान थेट समृद्धी महामार्गावर ताईच्या समर्थकांनी भाऊच्या समर्थकांची गाडी अडवून शिवीगाळ अन् जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी ताईच्या समर्थकांवर गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे, त्यामुळे मनपा महापौर पदाचा निवडणुकीत नगरसेवकांच्या पाळवापळवीचा नवा ट्वीस्ट समोर आला असून यात कुणाचा खात्मा झाला तर वावगं ठरू नये अशीभयंकर राजकीय स्थिती निर्माण झाली आहे, या स्थितीचा फायदा घेऊन भाजप आता सत्ता स्थापनेच्या जवळ जात असल्याची माहिती आहे.

विजय वडेट्टीवारांनी पळवलेल्या आमच्या 3 नगरसेवकांसोबत खासदार प्रतिभा धानोरकर ताईचं बोलणं करून देण्यासाठी आम्ही गाडी थांबवली होती अशी प्रतिक्रिया सामाजिक माध्यमावर सौरभ ठोंबरे यांनी दिल्यामुळे वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्यात नगरसेवकांची सुरु असलेली पळवापळवी ही रस्त्यावरच्या मारामारीपर्यंत उतरल्याचं स्पष्ट झालं आहे. चंद्रपुरातील काँग्रेस नगरसेवकांच्या पळवापळवीचा थेट समृद्धी महामार्गावर झालेला प्रकार हा अत्यंत धक्कादायक असून सत्तेसाठी he लोक कुठल्या स्थरावर जाईल याचा नेम नाहीं.

कांग्रेसचे नगरसेवक निवडून आणण्यात कुणाला श्रेय?

खरं तर चंद्रपूर मनपा निवडणुकीत उमेदवारांना जे एबी फॉर्म वाटण्यात आले त्यात कांग्रेसचे जेष्ठ नेते विजय वडेट्टीवार आणि खासदार धानोरकर यांच्या सह्या आहेत, कांग्रेस ला चंद्रपूर जिल्ह्यात जिवंत ठेवण्याचं काम हें खऱ्या अर्थानं विजय वडेट्टीवार यांनी केलं आणि कांग्रेस मध्ये स्वर्गीय बाळू धानोरकर यांना आणून खासदार बनविण्यात वडेट्टीवार यांचं मोठं योगदान आहे, अर्थात ज्या प्रतिभा धानोरकर खासदार आहेत त्याचं श्रेय सुद्धा वडेट्टीवार यांनाच जातं, कारण धानोरकरांना शिवसेनेत तेवढं भविष्य नव्हतं हें कुणीही मान्य करेन, पण आता कांग्रेसला जिल्ह्यात सुगीचे दिवस आले असतांना व सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मिळून कांग्रेस चा महापौर बनविण्याची नामी संधी असतांना आपापली वेगळी राजकीय चूल मांडून धानोरकर आणि वडेट्टीवार काय साध्य करताहेत हेच कळायला मार्ग नाहीं. एवढं मात्र नक्की की कांग्रेस चे सर्वात जास्त नगरसेवक निवडून आणण्यात वडेट्टीवार यांचं काम आहे, त्यांनी उमेदवारांना चांगलं सहकार्य केल्याचं बोलल्या जातं आहे.