Home Breaking News सांस्कृतिक कार्यक्रमांना प्राधान्य द्यावे; विद्यार्थ्यांना नवी दिशा मिळेल – दिनेश दादापाटील चोखारे

सांस्कृतिक कार्यक्रमांना प्राधान्य द्यावे; विद्यार्थ्यांना नवी दिशा मिळेल – दिनेश दादापाटील चोखारे

सांस्कृतिक कार्यक्रमांना प्राधान्य द्यावे; विद्यार्थ्यांना नवी दिशा मिळेल – दिनेश दादापाटील चोखारे

नूतन कॉन्व्हेन्ट स्कूल, ताडाळी येथे प्रजासत्ताक दिन व देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा

चंद्रपूर :-  शालेय शिक्षणाबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमांना प्राधान्य देणे अत्यावश्यक आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले कौशल्य, आत्मविश्वास व नेतृत्वगुण विकसित होऊन त्यांना जीवनात नवी दिशा मिळते, असे प्रतिपादन काँग्रेस नेते, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तसेच ज्ञान प्रसारक मंडळ, ताडाळीचे संस्थाध्यक्ष दिनेश दादापाटील चोखारे यांनी केले.

News reporter :- अतुल दिघाडे

ज्ञान प्रसारक मंडळ, ताडाळी (जि. चंद्रपूर) द्वारा संचालित नूतन कॉन्व्हेन्ट स्कूल, ताडाळी येथे सोमवार, दि. २६ जानेवारी २०२६ रोजी ७६ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी दिनेश दादापाटील चोखारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत व देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण शाळा परिसर देशभक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाला.

प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, नृत्य, भाषणे व विविध सादरीकरणांद्वारे उपस्थितांची मने जिंकली. सायंकाळी झालेल्या कार्यक्रमांनी परिसरात देशभक्तीचा उत्साह संचारला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञान प्रसारक मंडळ, ताडाळीचे अध्यक्ष दिनेश दादापाटील चोखारे होते. प्रमुख पाहुणे म्हणून ग्रेस कंपनीचे व्यवस्थापक रतीलालजी अग्रवाल उपस्थित होते. तसेच माजी ग्रामपंचायत सदस्य सुबोध कासवटे, हेमराज जुनगरे, राजू आमटे यांच्यासह ताडाळी ग्रामचे प्रतिष्ठित नागरिक प्रफुल्ल गोती, अभय चिवंडे, कवडूजी दिवसे आणि शाळेच्या मुख्याध्यापिका अंजली कुरेकार यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी विविध स्पर्धांमध्ये प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना शिल्ड व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्य व सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थित पालक व मान्यवरांकडून विशेष दाद मिळाली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापिका अंजली कुरेकार यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. यामध्ये सहाय्यक शिक्षक सीमा कासवटे, चित्रा वासेकर, धानेश्वरी भगत, सुवर्ण झाडे, लता भरावी, छाया वरती, भाग्यश्री निमकर्डे, प्रगती खांडारकर तसेच अनिता चिवंडे यांच्यासह सर्व कर्मचारी व विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग लाभला.