Home चंद्रपूर चंद्रपूर महानगरपालिका महापौर पदासाठी अँड सारिका संदूरकर यांची भाजकडून जोरदार चर्चा?

चंद्रपूर महानगरपालिका महापौर पदासाठी अँड सारिका संदूरकर यांची भाजकडून जोरदार चर्चा?

भाजपला सत्ता स्थापनेची संधी मिळाल्यास एक उच्च शिक्षित महिलेला संधी मिळावी यासाठी अँड सारिका संदूरकर यांचे नाव समोर येण्याची शक्यता..

चंद्रपूर:-

चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत भाजपाच्या दिग्गज समजल्या जाणाऱ्या माजी महापौर राखी कंचर्लावार, अंजली घोटेकर व नगरसेविका छबू वैरागडे यांचा धक्कादायक पराभव झाल्यानंतर भाजपच्या महिला पक्ष संघटनेत आपल्या सामाजिक कार्यातून पक्ष संघटनेला बळकटी देण्याचं काम अविरतपणे करणाऱ्या उच्चशिक्षित व पक्षाच्या चंद्रपूर महानगर ओबीसी मोर्चाच्या अध्यक्षा अँड सारिका सचिन संदूरकर यांच्याकडे मोठी जबाबदारी येणार असल्याचे बोलल्या जात आहे, दरम्यान जर भाजपला महानगरपालिकेत सत्ता स्थापन करण्याची संधी मिळाली तर भाजप कडून महापौर पदासाठी अँड सारिका संदूरकर यांचे नाव सर्वात पुढे असेल अशी भाजपच्या अंतर्गत गोटातून माहिती मिळत आहे.

अँड सारिका संदूरकर यांचे सामाजिक कार्य मोठे असून त्यांना प्रशासनाचा चांगला अनुभव आहे, त्या २००५ मध्ये कौटुंबीक हिंसाचार समितीवर सदस्य म्हणुन कार्यरत होत्या, पंचायत समिती, चंद्रपूर येथे विधी सल्लागार या पदावर कार्य केल्याचा पाच वर्षाचा त्यांना अनुभव आहे. एकात्मिक बाल विकास प्रकल्प मध्ये २०११-१२ मध्ये सामाजिक कायदा व न्यायाबद्दल यामधील दुवा बनून त्यांनी शेकडो पीडितांना न्याय मिळवून दिला, मागील १० वर्षापासुन चंद्रपूर जिल्हा व सत्र न्यायालय येथे वकील पदावर त्या कार्यरत आहे. स्वरा महिला बहुउद्देशिय संस्थेमध्ये अध्यक्ष या पदावर त्या प्रदीर्घ काळापासून कार्यरत आहे. एकात्मिक बालविकास प्रकल्प, चंद्रपूर येथे कायदा व न्याय याबद्दल विशिष्द कार्य केल्याबद्दल त्यांना पुरस्कार मिळाला आहे. तर महिला बालविकास अधिकारी जि.प. चंद्रपूर यांच्या तर्फे सुद्धा त्यांचा सत्कार करून पुरस्कार देण्यात आला,

आमदार किशोर जोरगेवार यांच्या कडून पण अँड सारिका संदूरकर यांचे नाव..

भाजपचे जेष्ठ नेते तथा आमदार सुधीर मुनगंट्टीवार यांनी चंद्रपूर महानगर पालिकेत भाजपचा महापौर होईल अशी घोषणा केली आहे, दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी मिडीयाला प्रतिक्रिया देतांना भाजप कडे महापौर पदासाठी अनेक महिला सक्षम आहे असे म्हटले होते, त्यात त्यांनी अँड सारिका संदूरकर यांचे नाव सुद्धा उच्चारले होते त्यामुळे भाजपला सत्ता स्थापन करण्याची संधी मिळाली तर अँड सारिका संदूरकर यांच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडू शकते अशी राजकीय स्थिती निर्माण झाली आहे.