Home चंद्रपूर हवेली गार्डनमध्ये काँग्रेसचा भावनिक प्रचार शिखरावर — मा. खासदार प्रतिभा धानोरकर यांचा...

हवेली गार्डनमध्ये काँग्रेसचा भावनिक प्रचार शिखरावर — मा. खासदार प्रतिभा धानोरकर यांचा वाढदिवस जनतेसोबत साजरा;

 

हवेली गार्डनमध्ये काँग्रेसचा भावनिक प्रचार शिखरावर — मा. खासदार प्रतिभा धानोरकर यांचा वाढदिवस जनतेसोबत साजरा;

वडगाव प्रभाग क्र ८ मधील उमेदवार अजय बलकी यांच्या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद

चंद्रपूर :-  चंद्रपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ अंतर्गत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रभाग क्रमांक ८ (अ) चे अधिकृत उमेदवार अजय निलकंठराव बलकी यांच्या प्रचारार्थ हवेली गार्डन येथे आयोजित आमसभा भावनात्मक आणि प्रचारात्मक वातावरणात पार पडली. युवक-युवती, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत काँग्रेसवर विश्वास व्यक्त केला.

News reporter :- अतुल दिघाडे

या आमसभेला मा. खासदार प्रतिभाताई धानोरकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. विशेष म्हणजे आज त्यांचा वाढदिवस असल्याने प्रभाग क्रमांक ८ मध्ये नागरिक व काँग्रेस कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गजरात, घोषणांमध्ये आणि शुभेच्छांच्या वर्षावात त्यांचा वाढदिवस साजरा केला. “जनतेच्या नेत्या, जनतेसोबत वाढदिवस” अशी भावना संपूर्ण सभास्थळी दिसून आली.

वडगाव प्रभाग क्रमांक ८ मधील उमेदवार अजय निलकंठराव  बलकी यांनी आपल्या भाषणातून सामान्य नागरिकांचे प्रश्न, प्रभागातील विकास, मूलभूत सुविधा, युवकांचे भविष्य आणि सन्मानाचा मुद्दा ठामपणे मांडला. “ही लढाई पदासाठी नाही, तर प्रभागाच्या स्वाभिमानासाठी आहे” असे भावनिक आवाहन करत त्यांनी जनतेशी थेट संवाद साधला. त्यांच्या प्रत्येक शब्दाला उपस्थितांनी जोरदार प्रतिसाद दिला.

सभेदरम्यान काँग्रेसच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त करत नागरिकांनी एकमुखी पाठिंबा दर्शवला. हवेली गार्डनमधील ही आमसभा म्हणजे प्रभाग क्रमांक ८ (अ) मध्ये काँग्रेसच्या प्रचाराला मिळालेले नवे बळ असून, मा. खासदार प्रतिभाताई धानोरकर यांचा वाढदिवस आणि उमेदवार अजय निलकंठराव बलकी यांचा प्रचार — या दोन्हींचे भावनिक व राजकीय दर्शन घडवणारी ठरली.