Home Breaking News नुसता प्रचार नाही, तर मनमोकळा संवाद आणि समस्यांवर ठोस निवारण — वडगाव...

नुसता प्रचार नाही, तर मनमोकळा संवाद आणि समस्यांवर ठोस निवारण — वडगाव प्रभाग क्र. ८ (ब) मध्ये अजय निलकंठराव बलकी यांचा भावनिक प्रचार

नुसता प्रचार नाही, तर मनमोकळा संवाद आणि समस्यांवर ठोस निवारण — वडगाव प्रभाग क्र. ८ (ब) मध्ये अजय निलकंठराव बलकी यांचा भावनिक प्रचार

चंद्रपूर :-  नवीन पिढीचा आवाज, नव्या विचारांचं नेतृत्व आणि बदल घडवण्याची ठाम इच्छाशक्ती — हेच आज वडगाव प्रभाग क्रमांक ८ (ब) मध्ये पाहायला मिळत आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार यांचा प्रचार म्हणजे केवळ घोषणा नाहीत, तर नागरिकांशी थेट संवाद, मनमोकळ्या पणाने समस्या ऐकून घेणं आणि त्यावर विश्वासार्ह निवारण देण्याची ठाम भूमिका आहे.

News reporter :-  अतुल दिघाडे

साई बाबा वॉर्ड आणि डॉ. गांधी हॉस्पिटल परिसरात झालेल्या प्रचारादरम्यान प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांसह युवा वर्ग, विद्यार्थी आणि महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती दिसून आली. “अपकी बार अजय बलकी”, “अजय भाऊ बलकी” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. व्यावसायिक, युवक आणि विद्यार्थ्यांनी विकासात्मक प्राधान्यांवर भर देत अजय निलकंठराव बलकी  यांना भावी नगरसेवक म्हणून विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला.

अजय भाऊंची ओळख ही निष्ठावंत समाजसेवक, धार्मिक-सांस्कृतिक उपक्रमांना सक्रिय पाठिंबा देणारे नेतृत्व आणि उद्योजक व युवकांना मार्गदर्शन करणारा मार्गदर्शक अशी आहे. गोरगरीब, सामान्य नागरिकांच्या मदतीसाठी नेहमी धावून जाण्याची त्यांची वृत्ती हीच त्यांच्या कामाची खरी ओळख ठरली आहे. निवडणूक जिंकणे हा अंतिम उद्देश नसून लोकांची, विशेषतः युवा वर्गाची मने जिंकणे — हा ध्यास मनाशी बाळगून त्यांचा प्रचार सुरू आहे.

आज प्रभागात अजय निलकंठराव बलकी यांच्याबाबत सकारात्मक चर्चा असून, सुशिक्षित, जनतेशी जोडलेलं आणि जबाबदार नेतृत्व म्हणून नागरिकांची पसंती त्यांना मिळत असल्याचं चित्र आहे. बदलासाठी, विश्वासासाठी आणि कामासाठी — या निवडणुकीत वडगाव प्रभाग क्रमांक ८ (ब) मधील मतदारांचा कल अजय निलकंठराव बलकी यांच्याकडे झुकताना दिसत आहे.