
पहिला AB फॉर्म, पहिली दावेदारी… तरीही प्रश्न कायम सत्यम गाणार की नवं नाव ?
चंद्रपूर :- वडगाव प्रभाग क्रमांक ८ मधील भारतीय जनता पक्षाच्या (BJP) उमेदवारीवर अजूनही मोठा सस्पेन्स कायम असून, सत्यम गाणार आणि सोहम बुटले या दोन नावांमुळे कार्यकर्ते, नेते तसेच नागरिकांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. OBC उमेदवारीबाबत नेमका निर्णय कोणाचा, आणि प्रथम AB फॉर्म कोणाला मिळाला—यावरून प्रभागात चर्चांना उधाण आले आहे.
News reporter :- अतुल दिघाडे
प्राप्त माहितीनुसार, भाजपाच्या अधिकृत प्रक्रियेत वडगाव प्रभागातून निष्ठावंत व कर्मठ पदाधिकारी सत्यम संजय गाणार यांचे नाव प्रथम नोंदवले गेले असून, त्यांना भाजपतील अधिकुत यादीतही नाव असून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ताक्षराने अर्ज देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याच अनुषंगाने, निवडणूक निरीक्षक चैनसुख संचेती यांनि AB फ्राम देऊन AB अर्ज सर्वात आधी सत्यम गाणार यांनीच भरल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे.
दुसरीकडे, रवी जोगी यांनी सुद्धा AB अर्ज भरल्याची माहिती समोर येत आहे, तर सोहम बुटले यांना निवडणूक निरीक्षक चैनसुख संचेती यांनी AB फॉर्म दिल्याची माहिती पुढे आली आहे. या दोन्ही बाजूंनी समोर येणाऱ्या माहितींमुळे प्रभागातील राजकीय वातावरण तापले असून, “खरा भाजप OBC उमेदवार नेमका कोण?” असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महत्त्वाचे म्हणजे, AB फॉर्म मिळणेच नव्हे तर तो प्रथम कोणी भरला, यालाही तितकेच राजकीय महत्त्व असल्याने, अधिकृत कागदपत्रे आणि पक्षस्तरावरील अंतिम शिक्कामोर्तब याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, एकाच प्रभागात तिन्ही अधिकृत फॉर्म फिरत असल्याच्या चर्चांमुळे संभ्रम अधिकच वाढला आहे.
आता अवघ्या काही तासांत भाजपकडून अंतिम व अधिकृत घोषणा अपेक्षित असून, तोपर्यंत वडगाव प्रभाग क्र. ८ मधील नागरिक, कार्यकर्ते व नेते संभ्रमातच राहणार असल्याचे चित्र आहे.





