
विकासाची लढाई अधिक मजबूत; आता फक्त जनतेच्या सेवेसाठी…
वडगाव प्रभाग क्र. ८ मधून भावी नगरसेवक सौ. संगीता शेखर वाढई – नागरिकांच्या मनातील नगरसेवक
चंद्रपूर :- कामे अनेक असू शकतात, प्रश्न वेगवेगळे असू शकतात; पण जिद्द जर एकच असेल—फक्त आणि फक्त विकास—तर त्या जिद्दीला लोकांचा विश्वास मिळाल्याशिवाय राहत नाही. हाच विश्वास आज वडगाव प्रभाग क्र. ८ मधील नागरिकांच्या मनात ठामपणे दिसून येत आहे. जनतेच्या सर्वांगीण सेवेसाठी आणि प्रभागाच्या शाश्वत विकासासाठी झटणाऱ्या भावी नगरसेवक सौ. संगीता शेखर वाढई या आज नागरिकांच्या मनातील नगरसेवक ठरत आहेत.
News reporter :- अतुल दिघाडे
वडगाव प्रभागातील रस्ते, नाल्या, पथदिवे, पाणीपुरवठा, स्वच्छता, हरितीकरण, सौंदर्यीकरण अशा मूलभूत सुविधांपासून ते दैनंदिन नागरी समस्यांपर्यंत प्रत्येक प्रश्न गांभीर्याने समजून घेऊन तो मार्गी लावण्याची भूमिका त्यांनी कायम ठेवली आहे. “समस्या ऐकून पुढे ढकलणे नव्हे, तर ती सोडवून दाखवणे” हा त्यांचा ठाम दृष्टिकोन नागरिकांना भावत आहे.

स्वच्छ आणि सुंदर वडगाव घडविण्याच्या संकल्पासोबतच पर्यावरणपूरक उपक्रम, हरित पट्टा वाढविणे, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, तसेच सुरक्षित आणि प्रकाशमान रस्त्यांसाठी पथदिव्यांच्या नव्या लाईन्स, दुरुस्ती व देखभाल यावर विशेष लक्ष देण्यात येत आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत संवेदनशीलता दाखवत त्यांनी थेट संवाद साधण्याची परंपरा रुजवली आहे.
“नागरिकांच्या प्रत्येक अडचणीत सोबत उभे राहणे हेच खरे लोकप्रतिनिधित्व,” या भावनेतून सौ. संगीता शेखर वाढई यांनी प्रभागातील घराघरांत आपुलकीचे नाते निर्माण केले आहे. कोणताही प्रश्न असो—रस्त्याची दुरवस्था, नाली बुजलेली असो, पाण्याची अडचण किंवा स्वच्छतेचा प्रश्न—तत्काळ दखल घेऊन प्रशासनाशी समन्वय साधत कामे मार्गी नसेल लागत तर सता सहकार्याने कामे मार्गी लावण्याची त्यांची कार्यपद्धती नागरिकांचा विश्वास अधिक दृढ करत आहे.
आगामी काळात वडगाव प्रभाग क्र. ८ ला अधिक सुबक, सुरक्षित आणि विकासाभिमुख बनविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला असून, विकासाची लढाई आता अधिक मजबूत होत असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. त्यामुळेच आज वडगाव प्रभागातील नागरिकांच्या मनात एकच भावना व्यक्त होत आहे—
“आमच्या प्रभागाचा विकास म्हणजेच आमचा अभिमान, आणि त्या विकासाची धुरा सांभाळणाऱ्या सौ. संगीता शेखर वाढई म्हणजेच आमच्या मनातील नगरसेवक.”





