विकासाच्या हमीची लढाई सुरूच… वडगाव प्रभाग क्र. ८ मध्ये सौ. संगिता शेखर वाढई यांचे भक्कम नेतृत्व
शिव नगर – दत्तनगर–साईनगर परिसरात नव्या स्ट्रीटलाईटमुळे नागरिकांमध्ये समाधान
चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांची तारीख जाहीर होताच शहरातील राजकीय वातावरण तापू लागले असून, आजी-माजी तसेच भावी नगरसेवक कामाला लागले आहेत. मात्र काही चेहरे असे आहेत की, निवडणूक आली म्हणून नव्हे तर गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने लोकांच्या सुख-दुःखात सहभागी राहून त्यांनी नागरिकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. अशाच कर्तव्यदक्ष व विकासाभिमुख नेतृत्वामध्ये वडगाव प्रभाग क्रमांक ८ मधील भावी नगरसेविका सौ. संगिता शेखर वाढई यांचे नाव आज अग्रक्रमाने घेतले जात आहे.
News reporter :- अतुल दिघाडे
दत्तनगर, साईनगरसह संपूर्ण वडगाव प्रभागात सौ. संगिता वाढई या केवळ निवडणुकीपुरत्याच सक्रिय नसून, वर्षानुवर्षे प्रभागातील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने कार्यरत आहेत. रस्त्यांचे खडीकरण, डांबरीकरण, खराब रस्त्यांची दुरुस्ती, नाल्यांचे बांधकाम, नालीवर चेंबर बसवणे, ड्रेनेज व्यवस्था, स्ट्रीटलाईट दुरुस्ती, नवीन लाईट बसवणे, परिसराचे सौंदर्यीकरण अशा अनेक कामांमध्ये त्यांचा प्रत्यक्ष सहभाग नागरिक अनुभवत आहेत.
याच कार्याचा एक भाग म्हणून शिवनगर, दत्तनगर व साईनगर परिसरात नवीन स्ट्रीटलाईट बसविण्याचे काम नुकतेच पूर्ण करण्यात आले, त्यामुळे रात्रीच्या वेळी अंधारामुळे होणारी गैरसोय दूर झाली असून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. सुरक्षितता आणि सुविधा या दोन्ही दृष्टीने हा निर्णय नागरिकांसाठी दिलासादायक ठरला आहे.
स्थानिक नागरिक सांगतात की, “काम सांगितलं की त्या लगेच लक्ष घालतात. अधिकारी असोत किंवा कर्मचारी – काम व्हावे यासाठी स्वतः पाठपुरावा करतात. त्यामुळे त्या आधीपासूनच आमच्या मनातील नगरसेविका आहेत.”
हीच जनभावना आज सौ. संगिता शेखर वाढई यांच्या पाठीशी उभी राहताना दिसत आहे.
वडगाव प्रभाग क्र. ८ मध्ये विकास ही केवळ घोषणा न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरावी, हीच भूमिका घेऊन त्या सातत्याने काम करत आहेत. त्यामुळेच रस्ते, प्रकाश व्यवस्था, स्वच्छता, नाल्या, सौंदर्यीकरण यासारख्या प्रश्नांवर त्यांचा ठोस ठसा उमटलेला दिसतो. “विकासाच्या हमीची लढाई” ही केवळ घोषणा न राहता प्रत्यक्ष कृतीतून साकार होत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, वडगाव प्रभाग क्र. ८ मध्ये सौ. संगिता शेखर वाढई यांच्याबाबत वाढत असलेली लोकप्रियता, विश्वास आणि आपुलकी ही त्यांच्या कामाची पावती मानली जात आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत त्या भावी नगरसेविका म्हणून नागरिकांच्या पहिल्या पसंतीस उतरतील, असा विश्वास अनेक नागरिक व्यक्त करत आहेत.



