“निरंतर सेवा हेच ध्येय — युवा नेतृत्व राहुल वाढई यांच्या पुढाकाराने वडगाव प्रभागात रस्त्यांचे खड्डे बुजविण्याचे काम जोरात”
✊ युवा नेतृत्व स्वतःसाठी नाही तर जनतेच्या आनंदासाठी
चंद्रपूर :- “युवा नेतृत्व नेहमीच स्वतःसाठी नाही तर जनतेसाठी” — या विचाराची प्रचिती पुन्हा एकदा आली ती वडगाव प्रभाग क्र. ८ मध्ये. नागरिकांच्या अडचणींना आपलेसे मानून भावी नगरसेवक राहुल शेखर वाढई यांनी पुन्हा एकदा सेवा व समर्पणाची नवी उंची गाठली आहे.
News reporter :- अतुल दिघाडे
श्री गजानन मंदिराच्या मागील परिसरात गेल्या काही महिन्यांपासून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. पावसाळ्यानंतर या खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत होता. काही ठिकाणी रस्ता इतका खालावला होता की लोखंडी सळख्या बाहेर आलेल्या दिसत होत्या. त्यामुळे वाहनधारक, शाळकरी मुले आणि पादचारी यांच्यासाठी अपघाताचा धोका निर्माण झाला होता. अगदी अलीकडेच एका महिलेचा पाय घसरून ती पडल्याची दुर्घटनाही घडली होती.

ही परिस्थिती पाहून भावी नगरसेवक राहुल वाढई यांनी तत्काळ दखल घेतली. नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून त्यांनी कोणाचीही मदत न मागता स्वखर्चाने हा रस्ता दुरुस्त करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या आई सौ. संगीता शेखर वाढई आणि जिवलग मित्र श्री. विपिन अरुण देऊळकर यांच्या सोबत त्यांनी प्रत्यक्ष स्थळी उपस्थित राहून सिमेंट काँक्रीट टाकून खड्डे बुजविण्याचे काम पूर्ण केले.

या कामामुळे परिसरातील नागरिकांनी मोठा दिलासा घेतला आहे. आता रस्ता पूर्वीपेक्षा अधिक सुरळीत आणि सुरक्षित झाला असून वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे. स्थानिक नागरिकांनी राहुल वाढई यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
स्थानिक नागरिक म्हणाले, “आजच्या काळात स्वतःच्या जबाबदारीतून पुढे येऊन लोकांसाठी काम करणारे नेते कमी दिसतात. पण राहुल वाढई हे खऱ्या अर्थाने जनतेचे नेते आहेत. त्यांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता आमच्यासाठी केलेले हे काम आमच्या मनाला भिडले आहे.”

राहुल वाढई यांनीही नम्रतेने सांगितले की, “जनतेची सेवा करणे हेच माझे कर्तव्य आहे. नागरिकांचा त्रास कमी व्हावा, परिसर सुंदर आणि सुरक्षित व्हावा — हाच माझा उद्देश आहे. पुढेही अशाच प्रकारे मी माझ्या प्रभागातील लोकांसाठी कार्य करत राहीन.”
या उपक्रमामुळे वडगाव प्रभागात राहुल वाढई यांच्याबद्दल आदर आणि विश्वास अधिक दृढ झाला आहे. नागरिकांच्या मनात त्यांची प्रतिमा “जनतेसाठी सदैव तत्पर असलेल्या युवा नेत्याची” म्हणून अधिक बळकट झाली आहे.




