Home चंद्रपूर खेदजनक :- चंद्रपूरात गणेश विसर्जन मिरवणुकीतील “बाप तो बाप रहेगा.” ह्या गाण्यामागच...

खेदजनक :- चंद्रपूरात गणेश विसर्जन मिरवणुकीतील “बाप तो बाप रहेगा.” ह्या गाण्यामागच राजकारणं.

माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्यातील अस्तित्वाच्या लढाईत कोण बाप?

चंद्रपूर:-

जिल्ह्यातील भाजप पक्षात अंतर्गत वाढलेला कलह आणि आमदार व पदाधिकारी यांच्यात वाढलेला श्रेयवाद यामुळे कोणता गट मोठा यासाठी वर्चस्वाची लढाई सुरू झाली आहे, ती लढाई चंद्रपूर शहरात गणेश विसर्जन मिरवणूकीत प्रत्यक्षात याची देही याची डोळा सर्व गणेश भक्तांनी ती बघितली सुद्धा आहे, त्यामुळे दोन गटात हाणामाऱ्या होऊ नये म्हणून आयपीएस, पीएसआय दर्जाचे अनेक पोलीस अधिकारी आपल्या पोलीस ताफ्यासह भाजप च्या आमदार मुनगंटीवार आणि आमदार जोरगेवार यांच्या स्वागत मंडपाजवळ सुरक्षा देण्यासाठी तैनात होते, दरम्यान हरियाणी भाषेत असलेले व नरेंद्र बंगाना यांनी गायलेलं “बाप तो बाप रहेगा.” या अल्बम चं सन 2022 मधील “बाप तो बाप रहेगा” हे गाणं फार प्रसिद्ध झालं, ते गाणं आमदार मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्या स्वागत मंडपासमोर वाजलं खरं पण त्यात दोन्ही आमदार नाचले सुद्धा, मात्र हे गाणं वाजवून आम्हीच बाप आहो या तोऱ्यात किशोर जोरगेवार सारखे आमदार माजी मंत्री मुनगंटीवार यांना आव्हान देतात तेंव्हा मात्र हसावं की रडावं हे कळतं नाही, कारण आपण कुणाची कुणासोबत तुलना करतो? आपण काय आहो याची थोडी तरी आपल्याला लाज वाटायला पाहिजे हे जोरगेवार यांनी समजून घ्यायला हवं होतं, अरे ज्या माणसांनी आपल्याला घडवलं, त्यांच्या छत्रछायेत आपण आमदार बनण्याचं स्वप्न साकारलं, त्याला आव्हान देत मी बाप आहो असं दाखवणं म्हणजे मुर्खाच्या नंदनवनात नाचण्या सारखं आहे, अर्थात आमदार किशोर जोरगेवार यांची याबाबतीत भूमिका लहान मुलासारखी दिसते, कारण राज्याच्या राजकारणात ज्या व्यक्तींनी विधिमंडळ दणाणुन सोडलं त्या भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांना विरोधी पक्षांचे आमदार सुद्धा सलामी देतात, त्यांना किशोर जोरगेवार सारखे त्यांच्याच तालमीत मोठे झालेले आमदार स्वतःला त्यांचा बाप आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न सार्वजनिक ठिकाणी करत असतील तर मात्र भाजप च्या कार्यकर्त्यांनी याचं चिंतन, मनन आणि पठण करून योग्य तो निर्णय करणं गरजेचं आहे, कारण भाजप मधील हा वाद आता जनतेला तमाशा वाटू लागलाय आणि हा तमाशा एकमेकांचे जीव जाण्यापर्यंत पोहचला असल्याची खंत अनेक सुज्ञ कार्यकर्त्यांना आहे,

जिल्ह्याच्या राजकारणात भाजपमध्ये माजी मंत्री आणि विद्यमान बल्लारपूर आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा नेहमीच वचक राहिला आहे, कारण संघटनात्मक बांधणी असो की पक्षाचे विविध सामाजिक, राजकीय उपक्रम असो सुधीर मुनगंटीवार यांच्या व्यक्तीरिक्त कुठलाचं नेता पक्षाचा तेवढा प्रचार प्रसार करण्यात आणि पक्षाचे विचार जनतेपर्यंत पोहचविण्यात अग्रणी नाही अगदी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर सुद्धा, पण या वेळेच्या सन 2024 च्या विधानसभा निवडणूकी नंतर भाजप महायुतीला आलेलं मोठं यश आणि त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला प्रतिस्पर्धी नेता राज्यांच्या राजकारणात स्पर्धा करू नये म्हणून खेळलेली खेळी आणि सुधीर मुनगंटीवार यांना मंत्री पदाचा मिळालेला डच्चू यामुळे मुनगंटीवार यांचे विरोधक एकवटले आणि ज्यांनी भाजप पक्ष वाढवला त्या मुनगंटीवार यांनाच आव्हान देण्याचे सुरू केले, एवढेच नव्हे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या सोबत आहे हा बडेजावं करून ज्यांची लायकी नाही त्यांनी मुनगंटीवार यांना आव्हान दिले आहे, त्यामुळे भविष्यात जर सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे मोठी जबाबदारी आली तर मग हेच वाघ बनून फिरणारे मुनगंटीवार यांच्याकडे मेंढारासारखे कळपाने येतील असे चित्र दिसणार आहे म्हणून राजकारणात माज करायचा नसतो, कारण जशी समुद्राला भरती ओहोटी येते तशीच स्थिती राजकारणात होते आज सत्ता आहे उद्या सत्ता गेल्यावर आपल्याला कुत्र सुद्धा विचारात नाही याची जाणीव भाजप च्या मुनगंटीवार विरोधकांनी समजून घ्यावी कारण सुधीर मुनगंटीवार हे राज्याच्या राजकारणात सर्वाना पुरून उरणारे अभ्यासू आणि आक्रमक नेते आहेत आणि त्यांना हरवणं एवढं सोपं नाही.

सुभाष कासनगोट्टूवार यांच्या अंगात जोरगेवार संचारले कां?

चंद्रपूर शहराचे भाजप अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार हे सद्या शहरात फार चर्चेत आहे, अगोदर ते आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे विश्वासू होते, पण त्यांचं एक गुपित उघडं झालं आणि नंतर ते तत्कालीन आमदार नाना शामकुळे यांच्या तंबूत शिरले आणि आता जोरगेवार त्यांच्या जणू अंगात संचारले की काय? अशीच शंका यायला लागली आहे, सुभाष कासनगोट्टूवार यांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या कट्टर कार्यकर्त्यांना शहराच्या संघटन पदापासून दूर करण्याचे प्रयत्न चालवले व ज्यांना पदे दिली गेली त्यापैकी अनेकांनी राजीनामे दिले, आमदार किशोर जोरगेवार यांचे संरक्षक म्हणून ते सद्या वावरत असून “अम्माच्या” स्मारक बनण्याच्या फंदात ते पडले आणि तसेच तोंडघशी आपटले आणि आता गणेश विसर्जन मिरवणुकीच्या स्वागत मंडपाच्या वादात उडी घेऊन नारदाची भूमिका वठवली,

कासनगोट्टूवार यांच्या भूमिका पक्षातर्गत वाद निर्माण करणाऱ्या ठरत असतांना त्या विरोधकांच्या सुद्धा रडारवर आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करून त्यांनी अकलेचे तारे तोडले ते जनसामान्यांच्या मनांत विद्वेष निर्माण करणारे ठरत आहे, पण त्यांना आमदार जोरगेवार हे संरक्षण देत असल्याने त्यांच्या अंगात जोरगेवार संचारले आहेत असे चित्र दिसतं आहे.