भ्रष्ट मार्गाने परीक्षा घेऊन व हजारो गरीब विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान करुन श्रीमंताच्या मुलांना नोकऱ्या देणाऱ्या संचालकांचा निषेध.
चंद्रपूर :-
सिडीसीसी बैंकेच्या नोकर भरतीची परीक्षा ही मोठा घोळ करुन झाली असल्याचे स्वतः परीक्षार्थी सांगत असतांना आता मागासवर्गीयांचं हक्काचं आरक्षण डावलल्याने मागासवर्गीय एससी, एसटी व ओबीसी संघटना आता एकवटल्या असून आरक्षण बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून मागील 2 जानेवारी पासून साखळी ठिय्या आंदोलन व त्यानंतर मनोज पोतराजे यांचं आमरण उपोषण सूरु झालं. दरम्यान या आंदोलनाला अधिक धार यावी व सिडीसीसी बैंकेची नोकर भरती प्रक्रिया थांबावी म्हणून रमेश काळबांधे हे सुद्धा 21 जानेवारी पासून आमरण उपोषणाला बसले आहे आणि आता या आंदोलनाची दखल प्रसारमाध्यमानी घेतली असल्याने या आंदोलनाला मोठी प्रसिद्धी मिळतं आहे, अशातच आज दिनांक 23 जानेवारी ला सकाळी 11.00 वाजता आमरण उपोषण मंडपापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर सगळ्यां समाज संघटना व विद्यार्थी यांचा भव्य महामोर्चा निघणार आहे. भ्रष्ट मार्गाने परीक्षा घेऊन व हजारो गरीब विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान करुन श्रीमंताच्या मुलांना नोकऱ्या देणाऱ्या सिडीसीसी बैंक संचालकांवर कारवाई आणि या संचालकांना बरखास्त करण्याची मागणी करण्यात येणार आहे.
सिडीसीसी बैंकेचे अध्यक्ष संतोष रावत हे माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांचे खास असून त्यांच्या शिफारशीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कांग्रेसं प्रणित सिडीसीसी बैंकेच्या या बोगस भरती प्रक्रियेवर काहीही कार्यवाही करायला तयार नाही, म्हणजे कांग्रेस आणि भाजप ह्या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी सिडीसीसी बैंकेच्या बोगस व बेकायदेशीर नोकर भरतीला जणू कायदेशीर असल्याचं प्रमाणपत्र दिलं की काय अशी शंका उपस्थित होत आहे. कारण जिथे सिडीसीसी बैंकेच्या उपविधी मध्ये सन 2013 मध्ये स्वतः विद्यमान संचालकांनी 97 वी घटना दुरुस्ती करतांना बैंकेच्या नोकर भरतीत मगासवर्गीयांचे आरक्षण शासनाच्या नियमानुसार ठेवण्यात येईल आणि पदोन्नती मध्ये मागासवर्गीयांचा अनुशेष भरून काढण्यात येईल असं ठरावाद्वारे अधोरेखित करुन त्याला विभागीय सहनिबंधक प्रवीण वानखेडे यांनी मंजुरी दिली होती. मात्र आता त्याचं घटना दुरुस्तीला पायदळी तुडवून शासनाचे भाग भांडवल परत केले तर आरक्षण लागू होत नाही ह्या शासनाच्या न्याय विधी विभागाच्या केवळ अभिप्राय आणि सुचनेवरून मागासवर्गीयांचं आरक्षण संपवलं jat असेल तर ही मागासवर्गीय एससी, एसटी आणि ओबीसी समाजाच्या लोकांवर एक अन्याय आहे आणि बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान धोक्यात आणत आहे, त्यामुळे घटनाबाह्य आणि बेकायदेशीर होत असलेली नोकर भरती रद्द करण्यात यावी यासाठी या मोर्चाचे आयोजन आरक्षण बचाव संघर्ष कृती समिती च्या माध्यमातून उद्या होत आहे, या आंदोलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून ही घटनाबाह्य नोकर भरती रद्द करण्यासाठी एकत्र यावं असे आवाहन आरक्षण बचाव संघर्ष समितीद्वारे करण्यात आली आहे.




