पत्रकार परिषदेत घेण्यासाठी अनेक जिल्ह्यातील परीक्षार्थी चंद्रपुरात दाखल होणार, 23 जानेवारीच्या मोर्चात पण सहभाग नोंदविणार.
चंद्रपूर :-
चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बैंकेत नोकर भरतीच्या परीक्षेत घोळ झाल्याने या नोकर भरतीवर स्थगिती आणून पारदर्शक पद्धतीने टिसीएस किंव्हा आयबिपीएस या नामांकित कंपनी मार्फत परीक्षा घ्या आणि मागासवर्गीय एससी, एसटी आणि ओबीसी समाजाच्या मुलांना हक्काचं आरक्षण द्या या मागणीकरिता आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून मागील 2 जानेवारीपासून साखळी ठिय्या आंदोलन व त्या नंतर दिनांक 16 जानेवारी पासून मनोज पोतराजे व दिनांक 21 जानेवारीपासून रमेश काळबांधे हे आमरण उपोषण करत आहे, मात्र या आंदोलनाची दखल शासन प्रशासन घेत नसल्याने अनेक जिल्ह्यातील सिडीसीसी बैंकेची परीक्षा देणारे परीक्षार्थी आता चंद्रपूर मध्ये दाखल होऊन हा लढा अधिक तीव्र करणार आहे, दरम्यान सिडीसीसी बैंकेच्या परीक्षेत आयटीआय कंपनीने कसा घोळ केला आणि कशी परीक्षार्थीची फसवणूक केली याची संपूर्ण माहिती स्वतः परीक्षार्थी आज आमरण उपोषण मंडपात होणाऱ्या पत्रकार परिषदेतून देणारं आहे, त्यामुळे सिडीसीसी बैंकेची नोकर भरती कशी बोगस आहे हे आता समोर येणार आहे. दरम्यान आरक्षण बचाव संघर्ष कृती समिती द्वारे दिनांक 23 जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर आरक्षण बचाव मोर्चा चे आयोजन करण्यात आले त्यासाठी सुद्धा मोठ्या संख्येने परीक्षार्थी सहभागी होणार आहे.
शिपाई पदांच्या 97 जागांसाठी 261 जणांच्या मुलाखती पार पडल्या. आता लिपिकपदांच्या 261 जागांसाठी 783 जणांच्या मुलाखती सुरू आहेत. 23 तारखेला मुलाखती संपल्यानंतर 24 ला नियुक्तपत्र मिळण्याची शक्यता आहे. 27 ला बँकेवर प्रशासकाची नियुक्ती होईल, असे सांगितले जाते. ऑनलाईन परीक्षा घेणारी कंपनी सर्व विद्यार्थ्यांचे गुण संकेतस्थळावर टाकते. ‘आयटीआय’ने तसे काहीच केले नाही. परीक्षार्थ्यांच्या ‘लॉगिन आयडी’वर उत्तरपत्रिका पाठवल्या. यातील काही उत्तरपत्रिका बदलून गुण वाढवण्यात आले, असा परीक्षार्थ्यांचा आरोप आहे. आयटीआय कंपनीने परीक्षा घेवून परीक्षार्थ्यांची गुणांसह यादी जिल्हा मध्यवर्ती बँकेला दिली. त्यानंतर कंपनीचे काम संपले. सर्व परीक्षार्थ्यांचे गुण संकेतस्थळावर टाकण्याची जबाबदारी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या व्यवस्थापनाची होती. भरतीसंदर्भातील सर्व परिपत्रक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश्वर कल्याणकर यांच्याच स्वाक्षरीने निघाले. ज्या परीक्षार्थ्यांना मुलाखतींना बोलवण्यात आले, त्यांचेही गुण सार्वजनिक केले नाही. मुलाखतीच ‘कटऑफ’ नेमका किती गुणांवर होता, याबाबत गोपनीयता बाळगण्यात आली. साधारणतः कोणत्याही परीक्षेत परिक्षार्थ्यांचे गुण सार्वजनिक केले जातात, बँकेकडून लपवाछपवी करण्यात आली. त्यामुळे 40 गुण असलेल्या परीक्षार्थ्यांनाही मुलाखतीचे पत्र आले. 60 गुण असलेले परीक्षार्थी मात्र वंचित राहिले, असे काहींचे म्हणणे आहे.
दत्ता पौळ या परीक्षार्थीची सहकार राज्यमंत्री डॉ. भोयर यांच्याकडे तक्रार.
सिडीसीसी बैंकेच्या परीक्षेत झालेला घोळ आणि हजारो विद्यार्थ्यांना झालेला मानसिक त्रास सोबतच झालेला आर्थिक भुर्दंड यामुळे बैंकेची ही बोगस भरती रद्द करावी अशी सर्वत्र मागणी होत असतांना आता परीक्षार्थी शासनाकडे व न्यायालयात सुद्धा तक्रार घेऊन जात आहे अशीच तक्रार दत्ता पौळ या परीक्षार्थीनी राज्याचे सहकार राज्यमंत्री डॉ. भोयर यांच्याकडे केली आहे.
काय आहे तक्रारीचा संदर्भ?
दत्ता पौळ या परीक्षार्थीनी सहकार राज्यमंत्री डॉ. भोयर यांच्याकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की तक्रार मी मागील सहा ते आठ वर्षांपासून एमपीएससी, युपीएससी सारख्या मोठ्या परीक्षेची तयारी करत असतांना मी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेची लिपिक आणि शिपाई पदाची भरती परीक्षा दिली होती व शिपाई या पदाची मुलाखत सुद्धा दिली आहे, मात्र या नोकर भरती परीक्षेत सुरुवाती पासूनच म्हणजे दिनांक 21 डिसेंबर ला कॉम्पुटर मध्ये घोळ होता, त्यामध्ये कुठल्याही प्रश्नांचा योग्य पर्याय निवडला असता थोड्या वेळाने आपोआप चुकीचा पर्याय निवडला असल्याचे दिसत होते, असे सर्वच परीक्षा केंद्रात मुलांच्या लक्षात येताच एका तासातच महाराष्ट्रातील मुलांनी सहाही परीक्षा केंद्रात गोंधळ घालून आंदोलन केले, त्यामुळे प्रशासनाने त्या दिवशीची परीक्षा रद्द केली, परीक्षेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 22 डिसेंबर रोजी जालना जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर गेले असता परीक्षा घेणाऱ्या स्थानिक प्रशासनाने फक्त जालना जिल्ह्यातील परीक्षा रद्द केली मात्र त्याचं दिवशी महाराष्ट्रात सर्व ठिकाणी परीक्षा घेण्यात आल्या, दरम्यान परीक्षेच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे 23 डिसेंबर रोजी औरंगाबाद या ठिकाणी परीक्षा घेण्यात आली व त्यांची पूर्व सूचना परीक्षेच्या आदल्या दिवशी रात्री देण्यात आली, त्यामुळे जे दुरचे मुलं होते ते औरंगाबाद केंद्रावर पोहचू शकले नाही, या परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्रावर कुठलीही तपासणी (बायमॅट्रिक ) ची व्यवस्था नव्हती त्यामुळे दुसऱ्याच्या नावाने एक व्यक्ती परीक्षा देतांना पकडला होता व त्याच्या पायात मोबाईल आणि कानात इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट होते जे पकडले होते, परीक्षेचा शेवटचा दिवस म्हणजे 29 डिसेंबर रोजी जालना केंद्र असतांना नंतर नांदेड या ठिकाणी परीक्षा घेण्यात आली आणि आम्हां विद्यार्थ्यांना आगाऊचा आर्थिक भुर्दंड झाला.
परीक्षा घेणाऱ्या आयटीआय कंपनीचे हेल्पलाईन व ई-मेल सुद्धा बंद.
ते पुढे म्हणाले की ह्या परीक्षा झाल्यानंतर 9 जानेवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रश्नावर आक्षेप घेण्याची वेळ देण्यात आली, पण उत्तरापत्रिकेत कुठंलाही बदल न करता 12 तसाच्या आत निकाल लावून मला शिपाई पदासाठी मुलाखती करिता बोलाविण्यात आले. मात्र मला लिपिक पदासाठी घेतलेल्या परीक्षेत 65 मार्क्स असताना देखील मुलाखती करिता बोलाविण्यात आले नाही तर माझ्या मित्रांना 57 मार्क्स आले असतांना त्याला मात्र बोलविण्यात आले, हिचं तक्रार घेऊन मी 20 जानेवारी रोजी सकाळी 10.00 वाजेपासून पासून सिडीसीसी बैंकेच्या मुख्यालयात विचारपूस करण्यासाठी गेलो असता मला सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत मुख्य कार्यकारी अधिकारी कल्याणकर साहेब यांच्या ऑफिस बाहेर बसाविण्यात आले, त्यावेळी माझ्यासोबत इतर चार परीक्षार्थी होते , त्यांनी आम्हांला एक तास वेळ दिला दरम्यान आम्ही परीक्षा घेणाऱ्या आयटीआय कंपनीचे हेल्पपाईन नंबर आणि मेल बंद असल्याबाबत विचारणा केली असता त्यांनी लगेच कंपनीच्या सिइओ ला कॉल करुन विचारणा केली की आपले हेल्पलाईन नंबर कां बंद आहे व इमेल कां जात नाही त्यांनी आम्ही हे हेल्पलाईन मोबाईल नंबर आणि ई-मेल लगेच सुरु करुन तुमच्या तक्रारी ला उत्तर देऊ असे सांगितले.
मी त्यांना फोनवर बोलताना विचारले की संगणकाचे जनक कोण हा प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर दिले चाल्स वेबस, परंतु माझे हेच उत्तर असतांना त्यांनी मला या प्रश्नाचे मार्क दिले नाही आणि सकाळ पर्यंत दुरुस्त करू अशी ग्वाही दिली होती पण 24 तासानंतर सुद्धा उत्तर तालिकेत कोणताही बदल करण्यात आला नाही आणि हेल्पलाईन नंबर आणि ई-मेल सुद्धा सुरु करण्यात आले नाही.




