Home Breaking News चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूर – “माझी वसुंधरा अभियान ५.०” अंतर्गत हरित शपथ...

चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूर – “माझी वसुंधरा अभियान ५.०” अंतर्गत हरित शपथ घेण्याचे आवाहन!

चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूर – “माझी वसुंधरा अभियान ५.०” अंतर्गत हरित शपथ घेण्याचे आवाहन!

चंद्रपूर  :-  चंद्रपूर शहरातील सर्व नागरिक, संस्था, संघटना, विद्यार्थी, शिक्षक, आणि बचत गट यांना कळविण्यात येते की हवामान बदलावर नियंत्रण ठेवण्यासाठी “माझी वसुंधरा अभियान ५.०” अंतर्गत हरित शपथ (#Epledge) घेणे आवश्यक आहे. आपल्या दैनंदिन जीवनात पर्यावरणपूरक बदल करण्यासाठी आपल्याला या शपथ घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

News reporter :- अतुल दिघाडे

हरित शपथ (#Epledge) कशी घ्यायची?

  1. लिंकवर क्लिक कराहरित शपथ घेण्यासाठी येथे क्लिक करा
  2. लिंक उघडल्यानंतर, वैयक्तिक किंवा ग्रुप पर्याय निवडा. (जर तुम्ही ग्रुपने शपथ घेत असाल तर ग्रुप निवडा, अन्यथा वैयक्तिक.)
  3. आपल्या तपशीलांचा (नाव, वय, पेशा, इ.) अचूक भरावा.
  4. “चंद्रपूर शहर महानगरपालिका” पर्याय निवडा.
  5. इच्छित शपथ निवडा आणि सबमिट करा.
  6. नोंद झाल्यानंतर तुम्हाला वसुंधरा मित्र प्रमाणपत्र मिळेल.
  7. प्रमाणपत्र फेसबुकवर अपलोड करा आणि शपथ घेतल्याचे फोटो अपलोड करा.

उद्दिष्ट:

  • हवामान बदलावर नियंत्रण ठेवणे.
  • पृथ्वीच्या संरक्षणासाठी एकत्र येणे.
  • चंद्रपूर शहराला स्वच्छ, हरित आणि सुंदर बनविणे.

संपूर्ण समुदायाच्या सहभागानेच वसुंधराचे रक्षण शक्य आहे! चला, एक पाऊल पुढे टाकून हवामान बदल आणि प्रदूषणाविरोधी जागरूकता वाढवूया! 🌱

#माझीवसुंधरा #Epledge #Chandrapur #IndiavsGarbage #SwachhBharatMaharashtraMissionUrban #SwachhSurvekshan2024 #SwachhBharatMission #MajhiVasundhara5