अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी
चंद्रपुरात पाचव्यांदा प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या श्री नवयुग बाल गणेश मंडळाचे विशेष यश….
चंद्रपूर :- दत्त नगर, नागपूर रोड येथील श्री नवयुग बाल गणेश मंडळाने पर्यावरण पूरक देखावे सादर करून पाचव्यांदा प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. मागील चार वर्षांपासून या मंडळाने उत्कृष्टता साधत एक विशेष ओळख निर्माण केली आहे.
यावर्षी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या आयोजनातील उत्कृष्ट गणेश मंडळ स्पर्धेत मंडळाने पाण्याचे महत्व आणि वृक्ष लागवडीचे संदेश देणारा देखावा सादर केला. या उपक्रमाद्वारे समृद्ध शेतीच्या महत्त्वावर लक्ष केंद्रित करण्यात आले.
News reporter :- अतुल दिघाडे
अलीकडेच मुंबईतील यशवंत नाट्य मंदिरात माननीय सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते मंडळाला बक्षीस प्रदान करण्यात आले. सतत पाच वर्षे प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या मंडळाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
श्री नवयुग बाल गणेश मंडळाच्या या यशाबद्दल सर्वांचे हार्दिक अभिनंदन!




