Home चंद्रपूर प्रेमाचा बळी :- प्रेमाच्या त्रिकोणात पहिल्या प्रियकराचा प्रेयसीवर लोखंडी रॉड ने वार..

प्रेमाचा बळी :- प्रेमाच्या त्रिकोणात पहिल्या प्रियकराचा प्रेयसीवर लोखंडी रॉड ने वार..

प्रेयसी पाच दिवस मृत्युंशी झुंज देऊन अखेर झाली गतप्राण, आरोपी प्रियकर पोलिसांच्या ताब्यात.

चंद्रपूर / वर्धा :-

प्रेमाच्या गावात आणि बाराच्या भावात असे म्हटले तर वावगे ठरू नये कारण प्रेमाची नशा अच्छा अच्छाची जीवनयात्रा बनताना आपण बघितलं असेल त्यात प्रेम विरह माणसाला स्वतःच्या जिवापेक्षा सुद्धा जास्त महत्वाचा वाटतो शिवाय प्रेमात तिसरा आला की मग एकाच अंत होतं असतो अगदी असाच प्रसंग वर्धा जिह्यातील सावंगी मेघे येथे घडला असून सावंगी येथील नर्सिंग महाविद्यालयात एएनएमची प्रथम वर्षांची विद्यार्थिनी असलेल्या पूजाला तिच्या वाढदिवशी प्रियकर प्रवीण याने तुझे मोहित सोबत प्रेम आहे असा संशय घेऊन लोखंडी रॉड ने तिचेवर वार करून गंभीर जखमी केले व पाच दिवसाच्या मृत्युंच्या झुंजीनंतर ती गतप्राण झाली, या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होतं आहे, दरम्यान आरोपी प्रवीण याला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

सावंगी येथील नर्सिंग महाविद्यालयात एएनएमची प्रथम वर्षांची विद्यार्थिनी असलेली पूजा ही याचं परिसरातील ड्रीम लॅन्ड सिटी पार्क येथील एका घरी राहत होती. दरम्यान तीचा वाढदिवस असल्याने तीचा प्रियकर हा 21 जुलै रोजी रविवारीला तिला भेटण्याकरिता रूमवर गेला परंतु त्याला पुजावर संशय आला आणि दोघांची तू..तू झाली त्यात रागाच्या भरात प्रवीण ने राग अनावर झाल्याने पुजावर लोखंडी रॉड ने वार करून गंभीर जखमी केले व त्याचं अवस्थेत तिला सोडून तो फरार झाला, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पुजाला 22 जुलै सावंगी मेघे रुग्णालयात भरती करण्यात आले पण तिने मृत्युंशी झुंज देत अखेर पाच दिवसानंतर प्राण सोडला आणि प्रेमाचा बळी गेला. प्रेमाच्या बंधनात आनाभाका असतात, कधी प्रेम भंग होतो पण प्रेमाचा बळी घेणे योग्य नाही, प्रेम म्हणजे प्रेम असतं ज्याचं त्याचं सेम असतं तर मग काही प्रेमवीर प्रेयसीच्या हत्त्या का करतात हे कोडं मात्र सुटताना दिसत नाही.