मनसे कडून राजू कुकडे वरोरा विधानसभा निवडणुक लढणार
जनता दरबार भरवून जनतेच्या समस्या सोडविणारा राजू कुकडे
या क्षेत्रातील पहिला नेता ठरल्याने जनतेतून सहानुभूती मिळणार ?
राजेंद्र मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर
वरोरा:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे हे मागील सतरा वर्षांपासून जनसेवेत असून त्यांनी त्यांच्या तडफदार लेखणीने मोठमोठ्या राजकीत नेत्यांसोबत पंगे घेऊन सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न चालवलेला आहे, त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी करिता वरोरा तहसीलवर काढलेला बैलबंडी मोर्चा, टेमुर्डा येथे हिवाळी अधिवेशनात केलेला रस्तारोको आंदोलन प्रभावी ठरले, सावकारी पाशात अडकलेल्या शेतकऱ्यांना पाठबळ देऊन त्यांनी शेतकऱ्यांच्या सावकारांकडे जाणाऱ्या जमिनी रोकल्या तर कित्तेक निवेदने पत्रकार परिषदा घेऊन ते जनतेचे प्रश्न सोडवीत असल्याने त्यांना वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात मोठे जनसमर्थन मिळण्याचा अंदाज आहे. मनसेच्या वरिष्ठानी नुकतीच या विधानसभा क्षेत्रात अनेक क्षेत्रातील मान्यवरांची मते जाणून घेतली त्यात मनसे कडून राजू कुकडे यांचे नाव समोर असल्याची माहिती आहे, कारण त्यांच्या एवढा प्रभावाशाली नेता सध्या तरी मनसेत नाही, त्यामुळे बाहेरून आयात केलेला उमेदवार ज्याअर्थी मनसे कार्यकर्ते स्वीकारणार नसल्याने राजू कुकडे यांनाच मनसे कडून उमेदवारी मिळणार हे निश्चित मानले जातं आहे, कारण राजू कुकडे यांच्याकडे मोठे व्हिजन आहे ज्यांनी भद्रावती शहराचा विकास आराखडा तयार करून राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र
जिल्ह्यातील सहा विधानसभा पैकी वरोरा विधानसभा क्षेत्रात मनसेचा प्रभाव आहे, त्यामुळे वरिष्ठाच्या नजरा या विधानसभा क्षेत्रावर आहे, दरम्यान मागील विधानसभा निवडणुकीत मनसेतर्फे रमेश राजूरकर या नवख्या उमेदवाराला उमेदवारी दिल्यानंतर सुद्धा मनसेने तब्बल
मनसेचा जनता दरबार ठरतोय लक्षवेधक.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वरोरा येथील राजगड या जनसंपर्क कार्यालयात दर सोमवारला राजू कुकडे आणि त्यांचे पदाधिकारी मिळून जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी जनता दरबार घेतं असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होतं आहे, कारण जिथे लोकप्रतिनिधी जनतेच्या प्रश्नांनाकडे दुर्लक्ष करत आहे पण कुठलीही सत्ता नसताना राजू कुकडे हा एक मनसेचा पदाधिकारी जनता दरबार घेऊन जनतेचे प्रश्न सोडवितो हे सर्वसामान्य जनतेला न्यायालय सारखं आहे. कारण जनतेच्या समस्या जनता दरबारसोडविणारा राजू कुकडे हा या विधानसभा क्षेत्रातील पहिला नेता ठरला आहे त्यामुळे मनसेच्या राजगड कार्यालयातील जनता दरबार हा वरोरा तालुक्यात लक्षवेधक ठरत असल्याने त्यांच्याबद्दल जनतेत मोठी सहानुभूती असल्याचे चित्र दिसत आहे.
विकासाचा आराखडा तयार करण्याच्या भूमिकेला स्वीकारले आहे.
३५ हजार मते घेऊन दोन्ही उमेदवारांना टक्कर दिली होती यामध्ये जर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा निवडणूकीच्या प्रचारादरम्यान झाली असती तर कदाचित मनसेचा उमेदवार निवडून आला असता. आता त्यांची जागा राजू कुकडे यांनी येवून आपल्या संघटन कौशल्याच्या भरोशावर मनसेला एक निर्णायक स्थितीत पोहचविण्यात यश मिळविले आहे.




