मुल तालुक्यातील हळदी येथील घटना, अख्ख गाव हळहळलं, आरोपी बापलेक पोलिसांच्या ताब्यात.
मुल प्रतिनिधी :-
सामाजिक भान हरवलेल्या काही विकृत मानसिकता असलेल्या लोकांनी सर्वसामान्य लोकांचं जगणं मुस्किल केलं असल्याचं विदारक चित्र निर्माण होतं असून अगदी शुल्लक करणावरून कुणाचा जीव जाईल याचा नेम नाही अशीच एक हृदयद्रावक घटना मुल तालुक्यातील हळदी येथे सकाळी 10 वाजता घडली असून घराशेजारी झाडाच्या फ़ांद्यावरून झालेल्या वादात कुऱ्हाडीने राजेश बोधलकर यांची हत्या करण्यात आली आहे दरम्यान आरोपीना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास मुल पोलीस करीत आहेत.
घराशेजारील केबल बाजूला कर, असे म्हटल्याप्रकरणी रागाच्या भरात सूरज गुरुदास पिपरे (वय 21), आणि गुरुदास नक्तू पिपरे या बाप, लेकाने घराशेजारी रहाणाऱ्या युवकाचा कुऱ्हाडीने निघृण खून केला. ही हृदयद्रावक घटना सर्वत्र पसरली असून केवळ घराशेजारी असलेल्या झाडाचे फांद्या तोडल्यानंतर लागूनच असलेला केबल बाजूला कर, असा प्रेमाने सांगणाऱ्या घराशेजारील युवकावर गुरुदास नक्तू पिपरे सूरज गुरुदास पिपरे या बाप लेकाने कुऱ्हाडीने वार करुन राजू शेषराव बोदलकर या युवकाचा निघृण खून केला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मृतक हा अत्यंत शांत व संयमी स्वभावाचा होता. मृत्युपश्चात त्याला एक मुलगा, एक मुलगी व पत्नी आहे.




