Home महाराष्ट्र राजसाहेब, त्या बेकायदा मासेविक्रेत्यांना हटवा’ अशी मागणी करत कोळी भगिनी कृष्णकुंजवर.

राजसाहेब, त्या बेकायदा मासेविक्रेत्यांना हटवा’ अशी मागणी करत कोळी भगिनी कृष्णकुंजवर.

 

भैय्याला दिली ओसरी … भैय्या हातपाय पसरी …अशी गत महाराष्ट्रात झाली असल्याचे विदारक चित्र.

राज दरबार :-

मुंबईत डोंगरी मासळी बाजाराबाहेर परप्रांतीय मासेविक्रेत्यांचं मोठ्या प्रमाणात अतिक्रमण व त्यांच्या मुजोरीमुळे कोळी बांधवांचा व्यवसाय मंदावला असल्याने “राजसाहेब, त्या बेकायदा मासेविक्रेत्यांना हटवा’ अशी मागणी करत कोळी भगिनी कृष्णकुंजवर पोहचल्या व त्यांच्या या गंभीर प्रश्नावर राजसाहेबांनी प्रश्न मार्गी लावण्याबद्दल उपस्थित महिलांना आश्वस्त केल.

मतदानाचा वेळी ही लोक गायब कशी होतात हेच कळत नाही तेव्हा नाही का साहेब आठवत? डब्बे वाले, हॉटेल वाले, मंदिर वाले, विमान कंपनी वाले सर्वच कुठे गायब होतात तेव्हा? ” गरज सरो वैद्य मरो ” ही भावना या प्रत्येकात आहे. त्यामुळे या सर्वांचे काम करताना निवडणुकीसाठी राजसाहेबांनी अशा लोकांकडून शब्द घेतलाच पाहिजे नव्हे प्रत्येक वेळी मदतीसाठी जो येईल त्याचा मोबाइल नंबर नाव पत्ता घेतला पाहिजे. निवडणुकीला शिवबंधन, आणि कामासाठी कृष्णकुंज हे योग्य नाही. नेत्यांनी राजसाहेबांकडे नेताना ही काळजी घेतली पाहिजे. नुसताच दिखावा नको. बस्स झालं आता आमदार द्या काम करतो. ही भूमिका मांडायलाच हवी.
परप्रांतीयांचा फक्त मासळीविक्रेत्यांना नाही तर सर्व ठीकाणीच ञास होतोय.पण कुठल्याच पक्षाचा नेता याबद्दल बोलायला तयार नाही.पण मनसे यांच्याविरुध्द कारवाई करायला गेली तर इतर पक्षाचे सर्व नेते एक होऊन या परप्रांतीयांबद्दल आपुलकी दाखवतील.आणि त्यांच्या बाजूने उभे रहातील. म्हणून मग लोकांना एकच आशादायी मार्ग असतो तो म्हणजे राज सरकार.त्यामुळे जनतेनीच ठरवाव की पुढे जाऊन आपण कोणत्या पक्षाला बहुमताने निवडून दायाचे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here