Home Breaking News आदिवासी विकासासाठी अग्रेसर आ, सुधीर मुनगंटीवार यांचा विश्वास; मार्गदर्शक शुभम गेडाम यांच्या...

आदिवासी विकासासाठी अग्रेसर आ, सुधीर मुनगंटीवार यांचा विश्वास; मार्गदर्शक शुभम गेडाम यांच्या नेतृत्वात भव्य कार्यक्रम

आदिवासी विकासासाठी अग्रेसर आ, सुधीर मुनगंटीवार यांचा विश्वास; मार्गदर्शक शुभम गेडाम यांच्या नेतृत्वात भव्य कार्यक्रम

गोंडवाना गोटूल पेनठाणा देवाळा स्थापनेचा १० वा वर्धापनदिन उत्साहात

देवाळा गावासाठी रुग्णवाहिकेची घोषणा; सभागृहाचे काम तातडीने सुरू करण्याची ग्वाही

चंद्रपूर :- देशाच्या प्रगतीमध्ये आदिवासी समाजाचे मोठे योगदान आहे. आदिवासी विद्यार्थ्यांनी एव्हरेस्ट सर करून आपली क्षमता सिद्ध केली आहे. आदिवासी समाजात एकलव्याची परंपरा आजही जिवंत आहे. त्यामुळे आदिवासी समाजाच्या सेवेचा कुठलाही विषय असला तरी मी तातडीने मदत करीत असतो आणि त्यांच्या विकासासाठी कायम अग्रेसर राहीन, असा विश्वास राज्याचे माजी मंत्री व आमदारसुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

🖊️ News Reporter :- अतुल दिघाडे

देवाळा (मोहुर्ली), ता. भद्रावती येथे गोंडवाना गोटूल पेनठाणा देवाळा यांच्या स्थापनेला १० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त गोंडी नृत्य सांस्कृतिक स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला राज्याचे माजी मंत्री व आमदार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक व आयोजक आदिवासी नेते शुभम गेडाम होते. संपूर्ण कार्यक्रम त्यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडला.

कार्यक्रमाला माजी जिल्हाध्यक्ष राहुल पावडे, भाजपा नेते रामपाल सिंह, परमेश्वर मडावी, डॉ. साची बंग, प्रभाकर कोरवते, संतोष पेन्दोर, सुनिता कातकर, बिरेंद्र सिंग ठाकूर, मनीष सिद्धू यांच्यासह बालपणे साहेब (क्षेत्रसहायक आगरझरी), वैद्य वनरक्षक देवाडा, गोरे वनरक्षक देवाडा, जाधव वनरक्षक देवाडा, सिद्धीकी मॅडम, मोरे वनरक्षक आगरझरी यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच प्रभू कोरवते, दिवाकर कोरवते, संतोष येरने, गणपत आत्राम, रमेश मरसकोल्हे, सुरेश मरसकोल्हे, गणेश खोकले, अतुल कुडमध्ये, नितेश येरने, सूरज चिकाम, जैन कन्नाके, कुणाल कुमरे, करण आत्राम यांच्यासह मोठ्या संख्येने आदिवासी बांधव व भगिनी उपस्थित होत्या.

यावेळी अनवाणी पायांनी स्वागतासाठी आलेल्या आदिवासी भगिनींच्या भावना पाहून आ. मुनगंटीवार यांनी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी बोलताना आ. मुनगंटीवार यांनी आदिवासी समाजाच्या विकासासाठी आपण कायम कटिबद्ध असल्याचे सांगितले. देवाळा गावासाठी सुसज्ज रुग्णवाहिका देण्याची घोषणा त्यांनी केली. तसेच मंजूर २० लाख रुपयांच्या आदिवासी सभागृहाचे काम तातडीने सुरू करण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

आ. मुनगंटीवार म्हणाले की, आदिवासी समाज हा निसर्गाशी जोडलेला समाज असून त्यांचा सन्मान, स्वाभिमान आणि विकासासाठी शासनाच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात आल्या आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, तेंदूपत्ता बोनस वाढ, स्वतंत्र निधी आणि शबरी आवास योजनेचा लाभ देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले.

कार्यक्रमात गोंडी नृत्य स्पर्धेद्वारे आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडले. पारंपरिक वेशभूषा, ढोल-नृत्य आणि सांस्कृतिक सादरीकरणामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. उपस्थितांनी कार्यक्रमाचे कौतुक केले.

शुभम गेडाम यांच्या नेतृत्वाची दखल

या संपूर्ण कार्यक्रमाचे यश आदिवासी नेतेशुभम गेडाम  यांच्या सक्षम नेतृत्वामुळे शक्य झाले. त्यांनी स्थानिक आदिवासी समाजाला एकत्र आणत सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेला हा कार्यक्रम आदिवासी एकतेचे व संस्कृतीचे प्रतीक ठरला.

समाजहितासाठी एकत्र येण्याचे आवाहन

“जय सेवा” ही फक्त घोषणा नसून समाजासाठी समर्पित जीवनाची प्रेरणा आहे. सेवा, संस्कार आणि समाजहित या मूल्यांवर चालत आदिवासी समाजाचा सन्मान आणि विकास अधिक बळकट करण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करावे, असे आवाहन आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.