Home Breaking News महानगरपालिका चंद्रपूरच्या झोन क्र. १ मध्ये रवी लोणकर यांची सभापतिपदा करिता निवड...

महानगरपालिका चंद्रपूरच्या झोन क्र. १ मध्ये रवी लोणकर यांची सभापतिपदा करिता निवड – विकासाला नवी दिशा

महानगरपालिका चंद्रपूरच्या झोन क्र. १ मध्ये रवी लोणकर यांची सभापतिपदा करिता निवड – विकासाला नवी दिशा

चंद्रपूर :- शहराच्या प्रशासकीय आणि विकासात्मक दृष्टीने महत्त्वाची समजली जाणारी चंद्रपूर महानगरपालिका मधील झोन क्रमांक १ मध्ये रवी लोणकर यांची सभापतीपदी निवड झाल्याची घोषणा होताच परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या निवडीमुळे झोनमधील विकासकामांना नवी चालना मिळेल, असा विश्वास नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

News reporter :- अतुल दिघाडे

रवी लोणकर हे मागील अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय असून, सामान्य नागरिकांच्या समस्या समजून घेत त्या सोडवण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, तसेच मूलभूत सुविधा यांसारख्या महत्त्वाच्या प्रश्नांवर त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. त्यांच्या या कामाची दखल घेत महानगरपालिकेच्या झोन क्र. १ मध्ये सभापतीपदी त्यांची निवड करण्यात आली आहे.

या निवडीमागे सुधीर मुनगंटीवार यांचे मार्गदर्शन आणि नेतृत्व महत्त्वपूर्ण ठरल्याचे मानले जात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली कार्य करताना रवी लोणकर यांनी संघटनात्मक आणि विकासात्मक कामात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

स्थानिक नागरिक, कार्यकर्ते आणि विविध सामाजिक संघटनांकडून रवी लोणकर यांचे अभिनंदन करण्यात येत असून, “आपल्या नेतृत्वात झोन क्र. १ चा विकास अधिक वेगाने होवो,” अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शहरातील पायाभूत सुविधा मजबूत करणे, स्वच्छता अभियान प्रभावीपणे राबवणे आणि नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे यावर भर दिला जाईल, अशी आशा आहे.

रवी लोणकर यांनी आपल्या निवडीबद्दल सर्वांचे आभार मानत, “माझ्यावर सोपवलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत नागरिकांच्या अपेक्षांवर खरे उतरू,” असा विश्वास व्यक्त केला आहे.

या निवडीमुळे महानगरपालिका चंद्रपूरच्या झोन क्र. १ मध्ये नव्या नेतृत्वाचा उदय झाला असून, आगामी काळात विकासकामांना निश्चितच गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

💐💐 रवी लोणकर यांना पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा !💐💐