Home चंद्रपूर खळबळजनक :- बल्लारपुरातील वेकोलिचे गौण खनिज डोंगर माफियांनी उडवले,

खळबळजनक :- बल्लारपुरातील वेकोलिचे गौण खनिज डोंगर माफियांनी उडवले,

वेकोली व्यवस्थापन अर्थपूर्तीच्या नशेत कुंभकर्णी झोपेत? कारवाई कोण करणार? मनसेची वेकोली सीएमडी कडे तक्रार.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

सध्या वेकोलि (WCL) येथील बल्लारपूर परिसरात गौण खनिज चे जे डोंगर उभे राहिले होते त्यातून गौण खनिज माफिया वेकोली अधिकारी यांच्यासोबत संगनमत करून अवैध व बेकायदेशीर उत्खनन करून राष्ट्रीय संपत्तीची चोरी करत असल्याचा खळबळजनक प्रकार सुरु असून रेल्वेच्या तिसऱ्या लाईन करिता हे गौण खनिज सोनाई इन्फ्रास्ट्रॅक्चर हया कंत्राटी कंपनीच्या माध्यमातून वापरले जात आहे, दरम्यान दिवसाढवळ्या गौण खनिज ची चोरी ही वेकोली अधिकारी यांच्या भ्रष्ट नितीमुळे होतं असल्याने याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष महेश वासलवार यांनी याबाबत वेकोली नागपूर सीएमडी यांच्याकडे तक्रार केली आहे त्यामुळे ते गौण खनिज माफिया पण चौकशी च्या रडारवर येणार असल्याची महिती आहे.

वेकोली व्यवस्थापन याबाबत मौन का?

बल्लारपूर वेकोली क्षेत्रातील गौण खनिजचे डोंगर दुरून दिसतात ते डोंगर पोखरले जात असल्याची बातमी पत्रकारांना मिळताच पत्रकारांनी इथे भेट दिली तर भयानक वास्तव समोर आलं, डम्पिंग यार्डमधून अवैध गौण खनिज उत्खनन करून वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या संदर्भात बल्लारपूर एरिया मॅनेजर मुरली यांना वेळोवेळी पुराव्यानिशी माहिती देऊनही कारवाईच्या नावाखाली केवळ ‘मौन’ पाळण्यात आले असल्याने त्यांचे या गौण खनिज माफियांशी अर्थपूर्ण संबंध असल्याचे दिसत आहे. खरं तर वेकोली अधिकाऱ्याचे हे गूढ मौन आता संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. कोट्यवधींच्या राष्ट्रीय संपत्तीची ही लूट कोणत्याही अंतर्गत संगनमताने शक्य आहे का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. खुद्द जबाबदार अधिकारीच या घोटाळ्याला मूक संमती देत ​​असल्याचे निष्पन्न झाल्याने याबाबत मनसे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष महेश वासलवार यांनी या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

मनसेची वेकोली सीएमडी कडे काय आहे मागणी?

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन, आता वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (WCL) चे चेअरमन, चीफ मॅनेजिंग डायरेक्टर (CMD) यांच्याकडे मनसेने लेखी केली असून, उच्चस्तरीय स्वतंत्र चौकशीची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान या बाबत गौण खनिज उत्खनन व वाहतूकीचे ठोस फोटो व व्हिडीओ सह पुरावे हे चौकशी अधिकाऱ्यांना देऊन या गौण खनिज उत्खननचा पर्दाफाश करणार असल्याची माहिती मनसे पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.